सौंदर्यामुळे रुद्राक्ष विकणारी मुलगी झाली व्हायरल
महाकुंभमध्ये भोपाळमधील सुंदर साध्वी हर्षा रिछारिया यांची चर्चा सुरू असताना आता रुद्राक्ष माळा विकणाऱ्या एका मुलीच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली आहे. या सुंदर मुलीचे नाव मोनालिसा असून ती इंदूरची रहिवासी आहे. या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर नेटिजन्स मोनालिसाच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक करत आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना मोनालिसा म्हणाली की, ती पहिल्यांदाच महाकुंभमध्ये आली आहे. ती आपल्या बहिणीसोबत महाकुंभमध्ये रुद्राक्ष माळा विकत आहेत. रुद्राक्ष माळा खरेदी करणारे ग्राहकसुद्धा मोनालिसाच्या सौंदर्याचे कौतुक करून तिच्यासोबत सेल्फी घेत आहेत. मोनालिसाचे पाणेदार डोळे, तिच्या सौंदर्याने अनेकांनी भुरळ घातली आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील मंदिरात मोनालिसा रुद्राक्ष माळा विकण्याचे काम करते. प्रयागराजमध्येही ती माळा विकण्यासाठी आली आहे. महाकुंभमध्ये आलेले साधू संत जास्त रुद्राक्ष माळा खरेदी करत आहेत, असे मोनालिसाचे म्हणणे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List