शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय? शेतकरी प्रश्नावरून रोहित पवारांचा महायुती सवाल

शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय? शेतकरी प्रश्नावरून रोहित पवारांचा महायुती सवाल

महायुती सरकार आमदारांसाठी 86 लाख रुपयांच्या बॅग घेणार आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. असे असताना शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, आज एका वृत्तपत्रात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याची तर दुसऱ्या वृत्तपत्रात मात्र आमदारांना अर्थसंकल्पाची प्रकाशने ठेवण्याकरिता देण्यात येणाऱ्या बॅग्ससाठी 86 लाखाची तरतूद करण्यात आल्याची बातमी बघितली. या दोन्ही बातम्या बघता, शासनाच्या खर्चाचं प्राधान्य काय असायला हवं, याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज वाटते.

तसेच अर्थसंकल्पानंतर अर्थसंकल्पाची पुस्तके ठेवण्यासाठी आमदारांना बॅग देण्याची प्रथा आहे. विधानपरिषदेच्या 12 रिक्त जागा वगळता आज विधानसभा आणि 354 सदस्य आहेत. 354 सदस्यांसाठी 82 लाख म्हणजे एका सदस्याची बॅग सर्व खर्च पकडून 23,200 रुपयांना पडते. राज्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देण्यासाठी सरकारकडे पैसे नसताना बॅगसाठी अशाप्रकारे महागडा खर्च करणे कोणत्याही आमदाराला पटणार नाही. मुळात अर्थसंकल्पाची पुस्तके ठेवण्यासाठी एवढ्या महागड्या बॅग्स देण्याची गरजच नाही. शासन पेन ड्राईव्ह देत असेल तर प्रिंटेड बुक्स देण्याची सुद्धा गरज नाही आणि त्यातही सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने web site वर उपलब्ध असतील तर पेन ड्राईव्ह देण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाही.

काळाच्या गरजेनुसार प्रथा परंपरा सुरू होतात परंतु बदलत्या काळासोबत अनावश्यक प्रथा परंपराही बदलाव्या लागतात. आज डिजिटल साधने उपलब्ध असताना, महागड्या बॅग्स देण्याची प्रथा बदलली नाही तर आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या digital india धोरणाला सुद्धा अर्थ राहणार नाही. आपल्या राज्याचे अर्थमंत्री शिस्तप्रिय आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब common man आहेत, मुख्यमंत्री अभ्यासू आहेत त्यामुळे त्यांनी अशा प्रथा परंपरा बंद करायलाच हव्यात.

शासनाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचे पैसे तत्काळ रिलीज करावेत आणि बॅग देण्यासारख्या प्रथा बंद कराव्यात, ही विनंती!

शासन ही प्रथा बंद करणार नसेल तर किमान माझ्या बॅगसाठी तरी खर्च न करता तो खर्च आवश्यक त्या ठिकाणी वळवावा. माझ्या भूमिकेशी सर्वच सदस्य सहमत असतील कोणाचे दुमत नसेल हा विश्वास आहे,त्यामुळे इतर सदस्यांनीही ही प्रथा बंद करण्यासाठी पाठपुरावा करावा, ही देखील विनंती असेही रोहित पवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील, ज्यांना नको ते नाही घेणार, जरांगे यांनी राणेंना स्पष्ट सुनावणे ज्यांना आरक्षण घ्यायचंय ते घेतील, ज्यांना नको ते नाही घेणार, जरांगे यांनी राणेंना स्पष्ट सुनावणे
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आरक्षणांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना स्पष्टच सुनावणे आहे. कुणबी आणि क्षत्रिय देखील आम्हीच...
‘…तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही,’पालकमंत्री पद न मिळाल्याने गोगावले संतापले
एक फोन कॉल आणि मोहम्मद शेहजादचा खेळ खल्लास, सैफ अली खानवरील हल्लोखोरांपर्यंत पोलीस पोहचले कसे? ही Inside Story वाचली का?
Bigg Boss 18 फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी ‘या’ स्पर्धकाने निर्मात्याला दिली मोठी रक्कम? नक्की काय आहे सत्य
‘माय नेम इज जान’चा दिल्लीत सोलो म्यूजिकल प्ले; केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले, या नाटकाचे अनेक शो व्हायला हवे
अटक होण्याच्या भीतीने आरोपी करत होता असं काम, तपासात धक्कादायक माहिती समोर
सोने चांदी नाही तर केसांवर जडला चोरांचा जीव, व्यापाऱ्याच्या घरात 150 किलो वजनाच्या केसांवर डल्ला