Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानी महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा पाडला फडशा, फायनलमध्ये केला प्रवेश

Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानी महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा पाडला फडशा, फायनलमध्ये केला प्रवेश

इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या खो-खो विश्वचषक 2025 मध्ये हिंदुस्थानी महिला संघाने उपांत्य फेरीच्या सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन केले. दक्षिण आफ्रिकेचा 50 गुणांनी पराभव करत टीम इंडियाने पहिल्यावहिल्या खो खो विश्वचषकाच्या फायनलमध्ये अगदी थाटात प्रवेश केला आहे. फायनलचा सामना रविवारी (19 जानेवारी 2025) नेपाळविरुद्ध रंगणार आहे.

पहिल्या डावातच भारताने आपले इरादे स्पष्ट करत दक्षिण आफ्रिकेला सळो की पळो करून सोडले. या सामन्यात दोन्ही डावात हिंदुस्थानने प्रत्येकी 5 असे 10 ड्रीम गुण मिळवत दक्षिण आफ्रिकेला जोरदार धक्का दिला. कर्णधार प्रियांका इंगळेने आपला धमाकेदार खेळ कायम ठेवत 4 गुणांची कमाई करत संघाच्या विजयचा खारीचा वाटा उचलला. चारी टर्ममध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. दुसऱ्या टर्ममध्ये 33-10, तिसऱ्या टर्ममध्ये 38-16 आणि चौथ्या टर्ममध्ये टीम इंडियाने 66-16 अशा खेळ संपवत 50 गुणांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात सर्वोत्तम संरक्षक म्हणून निर्मला भाटी आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून वैष्णवी पवार यांना गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्तम आक्रमक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या सिनेतेंबा मोसिया या पुरस्कार देण्यात आला. दुसरीकडे महिला गटात नेपाळने युगांडाचा 81-18 असा धुव्वा उडवला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दोन्ही संघांमध्ये फायनलची लढत रविवारी 19 जानेवारी रोजी रंगणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला आज दुपारी खेड गल्ली येथे बेस्ट बसने धडक दिली. मात्र आमदार शिंदे काही क्षणांपूर्वीच...
अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल
शमीचे पुनरागमन, बुमराही खेळणार, सिराज बाहेर!
जोगेश्वरीतील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा; पालिका आयुक्त बोलवणार बैठक, शिवसेनेच्या मागणीला यश
सातासमुद्रापार घुमणार ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा, लिव्हरपूल येथे दणक्यात साजरी होणार शिवजयंती
केईएमच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नोकरीतला वारसा हक्क कायम, कामगारांचा भव्य विजयी मेळावा