सातासमुद्रापार घुमणार ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा, लिव्हरपूल येथे दणक्यात साजरी होणार शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केवळ महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार ज्या ज्या ठिकाणी मराठी नागरिक बहुसंख्येने आहेत त्या ठिकाणीदेखील जल्लोषात साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही 19 फेब्रुवारी रोजी लिव्हरपूल येथे शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा नारा सातासमुद्रापार घुमणार आहे.
शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराचा भाग असलेल्या महाराष्ट्र मंडळ लिव्हरपूलच्या वतीने यंदाही लिव्हरपूल शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून मंडळातर्फे हा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 ते 9.30 या वेळेत येथील हिंदू कल्चरल ऑर्गनायझेशन येथे हा उत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त लोकनृत्य, गाणी, पथनाटय़, ढोलताशा पथकांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत, अशी माहिती अनिकेत मोरे, मंगेश खरात, अक्षय कुंटेवार यांनी दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List