Delhi Election 2025 – प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक; ‘आप’ चा भाजपच्या प्रवेश वर्मांवर आरोप

Delhi Election 2025 – प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या कारवर दगडफेक; ‘आप’ चा भाजपच्या प्रवेश वर्मांवर आरोप

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. आता आम आदमी पार्टीने भाजप उमेदवार प्रवेश यांच्यावर मोठा आरोप केला आहे. प्रवेश वर्मा यांच्या कथित गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला केला, असा आरोप ‘आप’ने केला आहे. गुंडांची स्थानिक नागरिकांशीही झटापट झाली. नागरीक बचावासाठी पुढे आले आणि कथित गुंडांनी पळ काढला, असे ‘आप’ने म्हटले आहे.

आम आदमी पार्टीने कथित हल्ल्याचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे. पराभवाच्या भीतीने भाजपा अस्वस्थ झाली आहे. भाजपने आपल्या गुंडांद्वारे अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला घडवून आणला. केजरीवाल यांनी प्रचार करून नये यासाठी प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी प्रचारादरम्यान विटा-दगडांनी हल्ला करून त्यांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अशा भ्याड हल्ल्यांनी केजरीवाल घाबरणार नाहीत. दिल्लीची जनता तमुच्या या भ्याड हल्ल्याला उत्तर देईल, असे आम आदमी पार्टीने म्हटले आहे.

दरम्यान, हल्ल्याची माहिती चुकीचे असल्याचे दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी म्हटले आहे. दोन्ही बाजूंनी घोषणा देण्यात येत होत्या. गोल मार्केटजवळ एकमेकांच्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांनी सर्वांना हटवलं. कोणावरही हल्ला झाला नाही, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल हे निवडणूक लढवत आहेत. तर भाजपने या मतदारसंघातून माजी खासदार प्रवेश वर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसचे संदीप दीक्षितही याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तंबाखूप्रमाणेच लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो? डॉक्टरांकडून जाणून घ्या तंबाखूप्रमाणेच लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो? डॉक्टरांकडून जाणून घ्या
    लठ्ठपणा ही भारतातील एक सामान्य समस्या आहे. पोटाची चरबी वाढल्याने आज विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. ही समस्या कमी
हिवाळ्यात त्वचा निरोगी कशी ठेवावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या
मानसिक ताणावासाठी ‘हे’ डिव्हाईस वापरा, वेळीच उपचार मिळणे सोपे होईल
फक्त 8,990 रुपयांमध्ये 32 इंच Smart TV खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या 3 जबरदस्त ऑफर
Kho Kho World Cup 2025 – हिंदुस्थानी महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा पाडला फडशा, फायनलमध्ये केला प्रवेश
Suzuki ने लॉन्च केली पहिली इलेक्ट्रिकल स्कूटर, जाणून घ्या किंमत आणि रेंज
धनंजय मुंडे यांचे दोर कापले… पालकमंत्र्यांच्या अख्खा यादीतच नाव नाही, अजितदादांच्या एन्ट्रीने बीडमध्ये साफसफाई होणार?