माझ्या मतदारसंघात बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्या, 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार – उत्तम जानकर
एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आपण राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगाला 23 तारखेला ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत, अशी माहिती जानकर यांनी स्वतः दिली. माझ्या मतदारसंघात (Malshiras Assembly constituency) बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
काय म्हणाले उत्तम जानकर?
उत्तम जानकर () म्हणाले की, धानोरे गावातील 1200 लोकांनी प्रतिज्ञापत्र करून निवडणूक आयोगाला पाठवलं आणि आमच्या गावात मतदानाची पडताळणी करून देण्याची मागणी केली. जर तुम्ही (निवडणूक आयोग) पडताळणी करणार नसाल तर, माझ्यावर या तालुक्याचा प्रचंड दबाव आहे. म्हणून मी 23 जानेवारीला माझ्या आमदारकीचा राजीनामा देत आहे.”
उत्तम जानकर पुढे म्हणाले की, ”मी राजीनामा दिल्यानंतर 25 तारखेला जर निवडणूक आयोगाने माझ्या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली नाही तर, मी आणि बच्चू कडू दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करू. ही पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी, ही माझी मागणी आहे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List