शिवानी सोनारच्या लग्नातील ‘उत्साही कार्यकर्ते’, घरी लग्नविधींना सुरुवात

शिवानी सोनारच्या लग्नातील ‘उत्साही कार्यकर्ते’, घरी लग्नविधींना सुरुवात

झगमगत्या विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर, मराठी सेलिब्रिटी देखील नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. किरण गायकवाड-वैष्णवी कल्याणकर, शाल्व किंजवडेकर, राजस सुळे यांच्यानंतर अभिनत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुले लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या घरी लग्नविधींना सुरुवात देखील झाली आहे. शिवानी सोशल मीडियावर मुंडावळ्या बांधून काही फोटो पोस्ट केले आहे. सध्या सर्वत्र शिवानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

शिवानीच्या लग्नाआधीचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. शिवानीने ‘टीम ब्राइड’सह ‘खंडेरायाच्या लग्नाला’ गाण्यावर रील देखील शेअर केलं आहे. शिवाय शिवानीच्या कुटुंबियांचा उत्साह देखील शिगेला पोहोचला आहे.

 

 

कुटुंबियांसोबत रील शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘उत्साही कार्यकर्ते’ असं लिहिलं आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी शिवानीवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केला आहे. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून शिवानीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात शिवानी आणि अंबर यांनी साखरपुडा उरकला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर शिवानी आणि अंबर यांच्या बॅचेलर पार्टीचे फोटोही चर्चेत आले. शिवानी-अंबरच्या लग्नाचा खास हॅशटॅगही चर्चेत आला. #AmbaAni असा हटके हॅशटॅग त्यांनी लग्नसाठी वापरला आहे.

 

 

शिवानी हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. शिवानी हिने ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिके शिवाय ‘सिंधूताई माझी माई’ आणि ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

शिवानी मराठी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर शिवानीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan Attack : मुंबई पोलिसांच्या हातावर हल्लेखोराच्या तुरी, तपासासाठी पोलीस या राज्यात, ओढावली मोठी नामुष्की Saif Ali Khan Attack : मुंबई पोलिसांच्या हातावर हल्लेखोराच्या तुरी, तपासासाठी पोलीस या राज्यात, ओढावली मोठी नामुष्की
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणात अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हल्लेखोराने मुंबई पोलिसंच्या हातावर तुरी दिल्याचे दिसून...
Maharashtra Breaking News LIVE 18 January 2025 : छगन भुजबळ यांची नाराजी दूर? आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला राहणार हजर
Jitendra Awhad : हल्लेखोराचा भयंकर इरादा, सैफ नाही तर कोण टार्गेट, जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट काय?
Saif Ali Khan: बायको, मुलं, कुटुंब नाही तर, शुद्धीवर येताच सैफने डॉक्टरांना विचारले ‘हे’ 2 प्रश्न
Rakhi Sawant : ‘सैफू करुची फिकीर करं, बेडरुम, बाथरुममध्ये…’, राखी सावंतची पहिली प्रतिक्रिया, VIDEO
Saif Ali Khan: आता कशी आहे सैफची प्रकृती? रुग्णालयाकडून मोठी हेल्थ अपडेट समोर
Sai Ali Khan : चोरटा लोकलने मुंबईबाहेर पळाला ? 3 दिवसांनंतरही सैफच्या हल्लेखोराचा मागमूस लागेना