माझं त्याच्याशी काही घेणं-देणं नाही, गोविंदाची पत्नी अजूनही नाराज ?, कृष्णाबाबत म्हणाली…

माझं त्याच्याशी काही घेणं-देणं नाही, गोविंदाची पत्नी अजूनही नाराज ?, कृष्णाबाबत म्हणाली…

काही महिन्यांपूर्वी अभिनेता गोविंदा जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाला होता. बंदुकीतून गोळी मिसफायर झाल्याने त्याच्या पायाला लागली आणि गोविंदाच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर त्याचा भाच्चा कृष्णा अभिषेक याने मामाची भेट घेतली आणि त्यांच्या मतभेद संपले, दुरावाही संपुष्टात आला. मामा-भाच्च्याचं मनोमिलन झालं असलं तरी त्याची मामी, अर्थात गोविंदाची पत्नी सुनीत ही अद्यापही कृष्णा अभिषेकवर अजूनही रागावलेली आहे. ती त्याला अद्यापही माफ करू शकलेली नाही. कृष्णाशी माझं काहीच घेणंदेणं नाहीये , असं एका मुलाखतीत सुनीता यांनीच हे स्पष्टपणे मान्य केलं.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये अभिनेता गोविंदा सहभागी झाला होता आणि त्यावेळी कृष्णासोतचे त्याचे अनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याबद्दल मुलाखतीत सुनीता यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, असंही सुनीता यांना विचारलं. ” मी खुश आहे, माझं कोणाशीही काहीच घेणंदेणं नाहीये. तो ( गोविंदा) त्याचा मामा आहे, मामा आणि भाच्यामध्ये जे काही होतं, त्यात मी कधी पडले नाही, काही बोलले नाही. ते तर कुटुंबाचा भाग आहेत, मी त्यावर काय बोलू शकते ? तो ( कृष्णा अभिषेक) गोविंदाच्या बहिणीचा मुलगा आहे, माझं त्याच्याशी काही (नातं) नाही. ” असं म्हणतं सुनीता यांनी हसून तो प्रश्न टोलवला.

गोविंदाची मजा केली ?

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये गोविंदाची थोडी खेचण्यात आली, त्याच्यावर जोक्स मारण्यात आले, त्याबद्दल काय म्हणणं आहे, असंही सुनिता यांना विचारण्यात आला. त्यावरही तिने स्पष्टपणे उत्तर दिलं, “ तो त्याचा भाच्चा आहे, तो तर त्याची ( गोविंदा) मजा करणारचं ना . तो गोविंदाची अशी ॲक्टिंग करतो ना, ते पाहूनच लोक बोलत असतील. आता मामा आणि भाच्यामध्ये सगळं काही आलबेल आहे, तर मी देखील खुश आहे ” असं त्यांनी सांगितलं.

मी तो एपिसोड पाहिला नाही

गोविंदा त्या शोमध्ये गेला होता, तुम्ही तो एपिसोड पाहिलात का असंही सुनीता यांना विचारलं. मात्र तेव्हा त्यांनी थेट नकार दिला. “ मी नेटफ्लिक्सचा तो संपूर्ण भाग तर पाहिला नाही, पण त्याचे छोटे- छोटे क्लिपिंग्स पाहिलेत ” असं त्यांनी नमूद केलं.

रवीना टंडनबद्दल थेट बोलल्या सुनीता

एखाद्या को-स्टारने गोविंदाशी फ्लर्ट केलंय किंवा लग्नापर्यंत विषय गेलाय का? या प्रश्नावर सुनीताने रविना टंडनच नाव घेतलं. अभिनेत्री रवीना आणि गोविंदा खूप चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलंय. ते चीची, ( गोविंदा) तू मला आधी भेटला असतास, तर मी तुझ्याशी लग्न केलं असतं. त्यावर सुनीता Reaction देताना म्हणाली की, ‘मी ( तिला) म्हटलं घेऊन जा, मग तुला समजेल’ असा किस्सा सुनीता यांनी सांगितला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर “मीच कॅबिनेट..”; कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’चा आणखी एक दमदार ट्रेलर
अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक अडथळ्यांना पार करत अखेर...
अखेर तो क्षण आलाच.. ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये एजे देणार प्रेमाची जाहीर कबुली?
“पुढच्या जन्मी माझे पती बनू नका..”, गोविंदाच्या पत्नीने जोडले हात; संसारात सर्वकाही आलबेल नाही?
तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी
Photo – मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरेचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाज
मध्य प्रदेशात मंदिरांच्या तोडफोडीवरून वातावरण तापले; सराफा बाजार बंद, हिंदू जैन समाजाचे आरोपप्रत्यारोप
गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका, शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र