पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सैफ अली खानच्या घरात दबा धरून बसलेल्या एका व्यक्तीनं त्याच्यावर हल्ला केला. मात्र अजूनही पोलिसांना या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश आलेलं नाहीये, आरोपी अद्यापही मोकाट आहे. त्यामुळे आता पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.पोलीस तपास सुरू असतानाच आणखी एक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे जेव्हा या व्यक्तीनं सैफवर हल्ला केल्या त्यानंतर आपण पकडले जाऊ नये यासाठी या व्यक्तीनं आपले कपडे बदलले होते.
सैफचं घर आणि वाद्रा येथील लकी हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून असं समोर येत आहे की, आरोपीने हल्ल्यानंतर आपला गेटअप बदलला होता. पोलिसांच्या 35 टीम सध्या या हल्लेखोराच्या मागावर आहेत. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीनं मध्यरात्री दोन ते अडीचदरम्यान सैफवर हल्ला केला, त्यानंतर तो सकाळी आठ वाजेपर्यंतच वांद्रा परिसरातच फिरत होता. मात्र तरी देखील पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलं नाही.
पोलिसांना देखील या गोष्टीमुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे की, सैफच्या घरात प्रवेश करण्यासाठी दोन एन्ट्री पॉइंट आहेत, आणि दोन्ही एन्ट्री पॉइंटवर सुरक्षा रक्षक तैनात होते मग हा हल्लेखोर घरात घुसला कसा? जेव्हा हल्लेखोरानं सैफवर हल्ला केला तेव्हा त्याने डोक्यात टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता.मात्र जेव्हा तो त्या बिल्डिंगमधून बाहेर पडला तेव्हा त्याने आपली टोपी आणि मास्क काढून टाकला होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तब्बल चाळीस ते पन्नास लोकांची चैकशी केली आहे. एका रिपोर्टनुसार हल्लेखोर जेव्हा सैफच्या घरात घुसला तेव्हा त्याच्या पायात चप्पल नव्हती, मात्र जेव्हा तो घराच्या बाहेर पडला तेव्हा त्याने पायामध्ये चप्पल घातली होती. सध्या सैफ अली खानवर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List