कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन
सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णूपंत कोठे (वय 59) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उद्या (दि. 15) सकाळी त्यांच्या पार्थिवावर जुना पूना नाकाजवळील वैपुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महेश कोठे यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता. बायपास सर्जरीही झाली होती. महेश कोठे व त्यांचे मित्र चार दिवसांपूवी कुंभमेळ्यात पवित्र स्नानासाठी प्रयागराज येथे गेले होते. आज पहाटे ते नदीवर स्नानासाठी गेले असता त्यांना त्रास होऊ लागला आणि ते खाली कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोठे यांना श्रद्धांजली वाहिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List