दाऊदी बोहरा समाजाकडून मुलांना ‘मोबाईलबंदी’ ; दुष्परिणाम रोखण्यासाठी उचलले पाऊल

दाऊदी बोहरा समाजाकडून मुलांना ‘मोबाईलबंदी’ ; दुष्परिणाम रोखण्यासाठी उचलले पाऊल

लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन धोकादायक वळण घेऊ शकते. मोबाईल अचानक काढून घेतला किंवा त्यांना मोबाईल दिला नाही तर अनेकदा मुले हिंसक होतात. अनेकदा तर ती टोकाचे पाऊल उचलतात. असले दुष्परिणाम रोखण्यासाठी आता दाउदी बोहरा समाजाने महत्त्वाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. मुलांना ‘मोबाईलबंदी’ करण्यात आली आहे. 15 वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा समुदायाच्या गटांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा आणि सेमिनार्स घेतले जात असल्याचे समोर आले आहे. दाउदी बोहरा समाजाकडून जागतिक स्तरावर अशा प्रकारचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान या वयात या मुलांना काय योग्य किंवा अयोग्य काय याचे आकलन नसते, अशी समाजाची भूमिका असल्याचे समोर आले आहे.

मुलांनी काय करावे?

मुलांना वाचन, मैदानी खेळ आणि कुटुंबासमवेत अधिकाधिक वेळ घालवण्यासाठीची संधी या गोष्टी करता याव्यात, त्यातून त्यांचा मानसिक विकास व्हावा हा मोबाईलबंदीमागचा प्रमुख हेतू असल्याचे समाजाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मोबाईल वापर कमी करण्यासंदर्भात सर्वच वयोगटांसाठी मार्गदर्शक सूचना असतील.

मुलांच्या मानसिक वाढीवर विपरीत परिणाम

मोबाईलचा अतिवापर किंवा मोबाईल हाताळण्याच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसीक वाढीवर विपरित परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांना त्यांच्या मानसिक विकासाच्या अवस्थेत मोबाईल देणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांना मोबाईलचे व्यसन जडू नये यासाठी ठोस पावले उचलावी किंवा त्यांना मोबाईल दिला जाऊ नये, असा सल्ला अनेक डॉक्टर्स आणि मानसोपचारतज्ञ देतात.

सोशल मीडिया आणि अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा अतिवापर

मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर मुलांमध्ये वाढू लागला आहे. त्यातून सायबरबुलिंग, ऑनलाईन फसवणूक, आक्षेपार्ह मजकूर सहज उपलब्ध होणे असे प्रकार घडू लागले आहेत. मुले फसवणुकीच्या या प्रकारांमध्ये  अडकून त्यांचे मोठे नुकसान करून घेऊ शकतात, अशी भूमिकाही समजाकडून मांडण्यात आली आहे. मोबाईलच्या अतिवापराचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर, शारिरीक हालचालींवर परिणाम होत असल्याची बाब दाउदी बोहरा समाजाने अधोरेखित केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती
राज्यभरात होणारी छिःथू, देशमुख कुटुंबाने दिलेला निर्वाणीचा इशारा यामुळे खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला अखेर ‘मकोका’ लावण्यात आला असून...
देशात अनेक गृहमंत्री झाले पण त्यांच्यापैकी कोणी तडीपार झाले नव्हते, शरद पवार यांचा अमित शहांवर हल्ला
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सक्ती, प्रकल्पासाठी 27 हजार एकर जमीन संपादित करणार
कश्मीरमध्ये एलओसीजवळ स्फोट हिंदुस्थानचे सहा जवान जखमी
बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुद्दा – ‘एचएमपीव्ही’ला घाबरू नका!
लेख – पास-नापासापेक्षा कौशल्य महत्त्वाचे!