रायगडातील अंगणवाडी सेविकांना ‘सावत्र बहिणी’ ची वागणूक, सरकारने 1 कोटी 35 लाख रुपयांचा प्रोत्साहन भत्ता लटकवला

रायगडातील अंगणवाडी सेविकांना ‘सावत्र बहिणी’ ची वागणूक, सरकारने 1 कोटी 35 लाख रुपयांचा प्रोत्साहन भत्ता लटकवला

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण’ योजना राबवली. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील 2 हजार 824 अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी 2 लाख 70 हजार महिलांचे ऑनलाइन अर्ज भरले. आपली दैनंदिन कामे बाजूला ठेवून अंगणवाडी सेविकांनी त्यासाठी मेहनत घेतली. पण आता या सेविकांनाच ‘सावत्र बहिणी’ची वागणूक मिळत आहे. सरकारने त्यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे 1 कोटी 35 लाख रुपये लटकवून ठेवले असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमच्या हक्काचा प्रोत्साहन भत्ता मिळणार तरी केव्हा, असा सवाल या अंगणवाडी सेविकांनी केला आहे.

जुलैमध्ये सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. आपली नियमित कामे आटोपून ग्रामीण भागातील महिलांचे या योजनेचे अर्ज भरून घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करीत होत्या. अंगणवाडी सेविकांना अनेकवेळा इंटरनेटच्या समस्यादेखील भेडसावल्या. तरीही या सेविकांनी अर्ज भरण्याची व अन्य कामे पूर्ण केली.

नशिबी फक्त प्रतीक्षाच

रायगड जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सक्षमपणे पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र उपेक्षितच राहिल्याचे चित्र आहे. त्यांना अजूनपर्यंत शासनाकडून प्रोत्साहनपर भत्ता मिळाला नाही. 1 कोटी 35 लाख रुपयांचा निधी शासनाकडून येणे बाकी आहे. त्यामुळे ही भत्त्याची रक्कम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणे अपेक्षित आहे. या रकमेची प्रतीक्षा अंगणवाडी सेविकांना लागून राहिली आहे.

• ही जबाबदारी त्यांनी खंबीरपणे पार पाडली. घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी योजनेचे अर्ज भरले. त्यांना प्रोत्साहन म्हणून 50 रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात हा भत्ता मिळालेलाच नाही.

● शासनाने दिलेल्या पोर्टलवर योजनेचे अर्ज भरताना अंगणवाडी सेविकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. रात्रीचा दिवस करून अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरून घेतले.

● रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना अनेक सरकारी उपक्रमांमध्ये काम करावे लागते. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या सेविका महत्त्वाची कामगिरी बजावतात. तरी देखील त्यांच्या प्रश्नांकडे आतापर्यंत सरकारने दुर्लक्ष केले असून आता हक्काचे पैसे देखील मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

रायगड जिल्ह्यातील 2 हजार 824 अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेसाठी 2 लाख 70 हजार ऑनलाइन अर्ज भरले होते. त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी शासनाकडून यादी मागवण्यात आली होती. तो अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. निधी प्राप्त झाल्यावर अंगणवाडी सेविकांना भत्ता दिला जाईल.
■ निर्मला कुचिक, (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद)

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती
राज्यभरात होणारी छिःथू, देशमुख कुटुंबाने दिलेला निर्वाणीचा इशारा यामुळे खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला अखेर ‘मकोका’ लावण्यात आला असून...
देशात अनेक गृहमंत्री झाले पण त्यांच्यापैकी कोणी तडीपार झाले नव्हते, शरद पवार यांचा अमित शहांवर हल्ला
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सक्ती, प्रकल्पासाठी 27 हजार एकर जमीन संपादित करणार
कश्मीरमध्ये एलओसीजवळ स्फोट हिंदुस्थानचे सहा जवान जखमी
बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुद्दा – ‘एचएमपीव्ही’ला घाबरू नका!
लेख – पास-नापासापेक्षा कौशल्य महत्त्वाचे!