वाल्मीक कराडचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत फोटो व्हायरल, संजय राऊत यांनी साधला निशाणा
बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड हे गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीच्या हातात देऊनही पंधरा दिवस उलटले तरी अद्याप वाल्मीक कराड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे वाल्मीक कराडला कोण वाचवतंय असा प्रश्न विचारला जात आहे. वाल्मीक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे असल्याने त्यांनी कराडला पळून जाण्यात मदत केल्याची चर्चा होत आहे.
व्वा! क्या सीन है??
नक्की कोण कुणाचा आका?
@Dev_Fadnavis
@anjali_damania
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde pic.twitter.com/a4jw2kWT6V— Sanjay Raut (@rautsanjay61) December 30, 2024
त्यातच आता वाल्मीक कराडचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी तो फोटो त्यांच्या सोशल मीडिया एकाऊंटवर शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. ”व्वा! क्या सीन है??नक्की कोण कुणाचा आका?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. या पोस्टसोबत त्यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांना टॅगही केले आहे.
फडणवीस-मुंडेंच्या मैत्रीचा तपासावर परिणाम
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत असल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची गाढ मैत्री आहे. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची सोबत केल्यानंतरही या मैत्रीत खंड पडला नाही. या मैत्रीच्या प्रभावामुळेच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास रखडला असल्याचेही आता बोलले जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List