पडघा टोलनाक्यावर वाहतुकीचा जांगडगुत्ता, खासदार बाळ्यामामा यांनी व्यवस्थापनाला धारेवर धरले
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडीचा फटका खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनाही बसला आहे. पडघा येथील टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे खासदारांचा ताफा या ठिकाणी अडकून पडला. वाहनांच्या रांगा इतक्या मोठ्या लागल्यामुळे खासदार म्हात्रे गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी टोल व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यानंतर टोल नाक्यावरील वाहनांच्या रांगा कमी झाल्या.
भिवंडी शहर व ग्रामीण भागातील मार्गावर वाहतूककोंडीची समस्यां गंभीर बनली असतानाच मुंबई-नाशिक महामार्गावरसुद्धा वाहतूककोंडीचा सामना वाहनचालक, प्रवासी यांना करावा लागत आहे. या महामार्गावरील पडघा येथील टोलनाक्यावरसुद्धा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या वाहतूककोंडीचा फटका भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनाही बसला आहे. बाळ्यामामा हे रविवारी रात्री उशिरा शहापूर येथून भिवंडी येथील आपल्या घरी परतत असताना त्यांचा ताफा टोल नाक्यावरील वाहतूककोंडीत अडकला. टोल वसुलीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने झालेल्या वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी बाळ्यामामा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. त्यांनी टोल व्यवस्थापनाला धारेवर धरत नागरिकांची वाहतूककोंडीतून सुटका केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List