गडहिंग्लज: कोबी तीन रुपये किलो; शेतकऱ्याने संपूर्ण पीकच केले नष्ट, दरातील चढउताराने शेतकरी हतबल

गडहिंग्लज: कोबी तीन रुपये किलो; शेतकऱ्याने संपूर्ण पीकच केले नष्ट, दरातील चढउताराने शेतकरी हतबल

>> संतोष नाईक, गडहिंग्लज

दिवस रात्र घाम गाळून, लाखो रुपये खर्च करून पिकविलेल्या भाजीपाल्याला घाऊक बाजारात कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे. घाऊक बाजारात कोबीला तीन रुपये किलो दर मिळाल्याने गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ येथील कुमार पाटील या शेतकऱ्याने चक्क आपल्या एक एकरातील संपूर्ण कोबी पिकावरच रोटर मशीन फिरवून नष्ट केले आहे. भाजीपाला दरातील चढउतारामुळे शेतकऱ्यांची होणारी बिकट अवस्था या घटनेने समोर आली आहे.

खणदाळ या गावातील कुमार पाटील या शेतकऱ्याने एक एकर शेतीत चाळीस हजार रुपये खर्च करून कोबी रोपाची लावण केली होती. 80 दिवसानंतर हे पीक काढणीला आल्यानंतर त्यांनी काढणी करून यातील दहा पोती कोबी कोल्हापूर येथील घाऊक बाजारपेठेत पाठवले होते, मात्र या ठिकाणी कोबीची आवक जास्त झाल्याने सौदा झाला नाही त्यामुळे ही पाठवलेली भाजी आहे तशी परत आली. त्यानंतर त्यांनी कर्नाटकातील संकेश्वर घाऊक बाजारात ही भाजी पाठवली त्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती. दराची घसरण झाल्याने किलोला तीन रुपये एवढा कवडीमोल दर मिळाला. केवळ सहाशे रुपयांचीच भाजी त्यांनी विकली. चाळीस हजार रुपये खर्च करून केलेल्या शेतीतून केवळ सहाशे रुपये मिळविण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली. भाजीपाल्याच्या दरातील चढ-उतारामुळे अखेर हताश होऊन या शेतकऱ्याने कोबीच्या या संपूर्ण शेतीवरच रोटर फिरवत नष्ट केले. भाजीपाल्याला चांगला दर मिळेल या आशेने केलेल्या या कोबी पिकावर नांगर फिरवून त्याचे खत करण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली.

सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं!

कोबीला दोन आठवड्यापूर्वी बाजारात पंचवीस रुपये इतका दर होता. मात्र त्यावेळी माझ्या शेतातील पीक काढणीला आलेले नव्हते. आता काढणी केली आणि दर एकदमच घसरला. किलोला तीन रुपये दर आहे. संकेश्वर, कोल्हापूर बाजारपेठांमध्ये ही भाजी पाठवली परंतु काहीच उपयोग झाला नाही. दरच मिळत नसल्याने मी कंटाळून संपूर्ण कोबी पिकावर रोटर फिरवून नष्ट केलो आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना जगणे मुश्किल होईल,अशा शब्दांत शेतकरी कुमार पाटील यांनी आपली व्यथा मांडली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमित शाह अनपढ… त्यांची ती लेव्हल नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्लाबोल अमित शाह अनपढ… त्यांची ती लेव्हल नाही; शरद पवार यांचा जोरदार हल्लाबोल
राजकारणात सध्या विरोध पक्षांना काही स्पेसच उरली नाही अशा महाविजय महायुतीला राज्यात मिळाला आहे. यामुळे विरोधी पक्षांना राजकारण करण्यासाठी वावच...
तू कोणत्याही लफड्यांमध्ये जाऊ नको… जितेंद्र आव्हाड यांनी का दिला जीवलग मित्र प्रताप सरनाईक यांना सल्ला?
PM Modi : पीएम मोदींच्या क्लासला जाताना महायुतीच्या आमदारांना सोबत नेता येणार नाही ही वस्तू
‘ॲनिमल’ मधील ‘त्या’ सीनवेळी तृप्ती डिमरीची वाईट अवस्था; म्हणाली “रणबीरसमोर मला …”
सून ऐश्वर्यासाठी जया बच्चन यांना शाहरुख खानच्या का लावायची होती कानशीलात?
महाकुंभमध्ये सर्वांत सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्ध झालेल्या हर्षाचं सत्य आलं समोर; साध्वी नव्हे तर..
98 दिवस ‘बिग बॉस 18’मध्ये राहिलेल्या चाहत पांडेनं कमावले तब्बल इतके लाख रुपये..