भर शूटींगमध्ये दिग्दर्शकाने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना बांधलं अन् पुढे…

भर शूटींगमध्ये दिग्दर्शकाने दोन प्रसिद्ध अभिनेत्रींना बांधलं अन् पुढे…

दोन मैत्रिणी, बहिणी सोबत असल्या की अनेकदा दोघींचे पटत नाही. काही गोष्टी खटकतात, टोलेबाजी होते किंवा काही ना काही तरी खटके उडतातच. एकदा असाच किस्सा घडला. दोन अभिनेत्री एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकींशी बोलतच नव्हत्या. ही नाराजी इतकी वाढली की, यासाठी एका दिग्दर्शकाला दोघींना बांधून ठेवावं लागलं होतं. पुढे काय झालं? तुम्हीच वाचा.

पडद्यावर आलेल्या अनेक चित्रपटांच्या कथा इतक्या चांगल्या असतात की लोकांना त्या खूप आवडतात. यामुळे पुन्हा पुन्हा तेच चित्रपट बघितले जातात. त्या चित्रपटाशी निगडीत म्हणजे सेटवरील काही रंजक किस्से तितकेच खास असतात. आज आम्ही तुमच्यासमोर असाच एक किस्सा ठेवणार आहोत. अहो वाचाल तर पोट धरून हसाल.

सलमान खान, आमीर खान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाचा हा किस्सा आहे. हा एक विनोदी चित्रपट होता. यात प्रेक्षकांना खळखळून हसवले गेले. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या या कल्ट क्लासिक चित्रपटाशी संबंधित एक किस्सा आहे. हा खूपच रंजक किस्सा आहे. जेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांना खांबावर बांधले होते. तेव्हा नेमकं काय झालं, हे तुम्हीच पुढे वाचा.

पडद्यावर आलेल्या अनेक चित्रपटांच्या कथा इतक्या चांगल्या आहेत की लोकांना त्या खूप आवडतात. त्या चित्रपटाशी निगडीत काही सेटवरील किस्से देखील खास आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक किस्सा सांगणार आहोत.

राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत करिश्मा कपूरने हा किस्सा सांगितला. करिश्मा कपूर म्हणाली होती की, ‘त्यावेळी शूटिंग 3-4 शिफ्टमध्ये चालायचे. रात्री 9-10 ते पहाटे 5 या वेळेत चित्रीकरण व्हायचे. एकदा चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मला आणि रवीनाला खांबाला बांधले होते आणि डिनर ब्रेक असतानाही आमची दोरी उघडली नव्हती. आम्ही खांबात अडकलो होतो आणि आम्ही तो उघडण्यासाठी आरडाओरडा करत राहिली.”

दोरीने बांधून दिग्दर्शकाने दिला अल्टिमेटम

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रवीना टंडन म्हणाली की, “करिश्मा आणि मी एकमेकांशी बोललो नाही. दिग्दर्शक आणि इतरांनी आम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. क्लायमॅक्सच्या एका सीनमध्ये आम्ही दोघी एका खांबाला बांधलेलो असतो, तेवढ्यात दिग्दर्शक आला आणि त्याने आम्हाला अल्टिमेटम दिला. जोपर्यंत या दोघी एकमेकींशी बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांची दोरी उघडणार नाही, असे त्यांनी सांगितले होते. एकमेकींशी बोलल्याशिवाय दोरी उघडू नका, असेही त्यांनी क्रू मेंबर्सना बजावले.

आम्हा चौघांचे एकमेकांशी भांडण होत

रवीना टंडन म्हणाली होती की, ‘शूटिंगदरम्यान आम्ही चौघे एकमेकांशी भांडत होतो. चौघांपैकी कोणीही एकमेकांशी बोलले नाही. आमीर खान, सलमान खान, करिश्मा आणि माझं बोलणं झालं नाही. तो चित्रपट इतका चांगला कसा ठरला हे मला माहित नाही, पण आपण सगळे खूप चांगले कलाकार आहोत हे यातून नक्कीच सिद्ध होते.’

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्… आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्…
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये...
‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
HMPV आणि COVID-19 दोन्ही आजार सारखेच आहेत की वेगळे? जाणून घ्या
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट