Prajakta Mali : प्राजक्ता माळी यांनी राजकारण्यांना सरळ सुनावलं, ‘तुम्ही…’
“पुरुष कलाकार परळीला गेले नाहीत का कधी? तुम्हाला उदाहरण द्यायचं तर पुरुष कलाकारांचं नाव घ्या. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी इंडस्ट्रीतल्या महिला कलाकारांची नावे घेतली. त्याचा गैरवापर केला. स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी महिलांची नावे घेतली. अतिशय कुत्सितपणे नावं घेतली. कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरात जाणं, मनोरंजन केलं आहे. परळीत नाही इतर ठिकाणी आम्ही गेलो आहोत. जात राहणार प्रेक्षकांचं मनोरंजन करणार” असं प्राजक्ता माळी यांनी ठणकावून सांगितलं. आमदार सुरेश धस यांनी काल बीडच्या नव्या एसपींची भेट घेतली. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच नाव घेतलं.
आज प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्या या वक्तव्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला. “परळीला कधीच पुरुष कलाकार गेला नाही का हो, कार्यक्रमाला. त्यांची नावे का येत नाहीत. इव्हेंट मॅनेजमेंटचं सांगायचं तर पुरुष कलाकारांचं नाव घेतात. महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात. पुढे येतात. आणि तुम्ही असं बोलून त्यांचं नाव डागळता” अशी खंत प्राजक्ता माळी यांनी बोलून दाखवली.
तुम्ही कुणाही बरोबर नाव जोडणार का?
“या आधीही प्रथितयश नेत्यांबरोबर फोटो आहेत. मान्यवरांबरोबर फोटो आहेत. त्या फोटोचा रेफरन्स उचलून तुम्ही कुणाही बरोबर नाव जोडणार का? हे एक महिला म्हणून, महिला कलाकार म्हणून मला ही बाब निंदनीय वाटतं. राज्यातील राजकारण्यांना ही गोष्ट शोभत नाही” असं स्पष्ट मत प्राजक्ता माळी यांनी व्यक्त केलं.
कुणाच्याही कुबड्यांशिवाय एखादी महिला यशस्वी होऊ शकत नाही का?
“ते जे बोलले ते इतकं कुत्सितपणे बोलले. काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही फक्त महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही तर त्यांच्या कर्तृत्वावरही शिंतोडे उडवत आहात. कुणाच्याही कुबड्यांशिवाय एखादी महिला यशस्वी होऊ शकत नाही का? कष्टानं एखादा व्यक्ती मोठा होतो. यावर तुमचा विश्वास का नाही बसत? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवता ही खेदजनक बाब आहे” असं प्राजक्ता माळी म्हणाल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List