कोटींचे घर, साड्यांचा ब्रँड अन् स्वत:चं युट्युब चॅनेल; अशोक सराफांच्या पत्नी निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती?

कोटींचे घर, साड्यांचा ब्रँड अन् स्वत:चं युट्युब चॅनेल; अशोक सराफांच्या पत्नी निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती?

आपल्या मराठी चित्रपटसृष्टी अशा अनेक दिग्गज अभिनेत्री आहेत ज्या चित्रपट मालिकांसोबतच स्वत:चा व्यवसायही चालवतात. अशाच एक अभिनेत्री अभिनेते अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ. त्यांचा काल म्हणजे 10 जानेवारी 2025 रोजी 59 वा वाढदिवस होता. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी जोडी आहे.

उत्तम अभिनेत्री सोबतच यशस्वी उद्योजिकादेखील

निवेदिता या उत्तम अभिनेत्री तर आहेतच पण सोबतच त्या यशस्वी उद्योजिकादेखील आहेत. शिवाय त्यांचं स्वत:चं युट्युब चॅनेलही आहे. तसेच सोबतच त्या चित्रपट, मालिकाही करत असतात. त्यामुळे निवेदिता यांची एकूण संपत्ती नक्की किती असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना असतेच. मग, जाणून घेऊयात की निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती आहे ते.

निवेदिता यांची एकूण संपत्ती

एका प्रसिद्ध मीडिया पोर्टलच्या रिपोर्टनुसार, निवेदिता जोशी- सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटी रुपये आहे. नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिराती अशा अनेक माध्यमांतून त्यांची कमाई होते. सोबतच त्यांचं स्वतःचं युट्युब चॅनेलही चालवतात. त्यांना पाककलेची खूप आवड आहे. त्या त्यांच्या चॅनेलवर निरनिराळ्या रेसिपी करून दाखवतात.

साड्यांचा ब्रँड

शिवाय त्यांचा स्वतःचा साड्यांचा ब्रँड देखील आहे. ‘हंसगामिनी’ असं त्यांच्या साडीच्या ब्रँडचं नाव आहे.
त्यांच्या कामाबद्दल सांगायचं तर निवेदिता सध्या स्टार प्रवाह वाहिनीवर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत दिसतायत. तर अशोक सराफ हे कलर्स वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत दिसत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या हा व्यवसाय करत आहेत. एवढच नाही तर त्या स्वत: यातील प्रत्येक साडी डिझाइन करतात.

तसेच त्यांच्या साड्यांच्या किंमती परवडेल अशा दरात असल्यानं कमी किंमतीत आणि ग्राहकांना डिझायनर साड्या उपलब्ध करून दिल्यानं ग्राहकांना समाधान मिळत असतं. सुरुवातीला त्यांनी अनेक ठिकाणी या साड्यांचं प्रदर्शन ठेवलं होतं.तसंच या व्यवसायातून अनेक गरजू महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनेक मराठी सेलिब्रिटीदेखील त्यांच्याकडून आवर्जुन साड्यांची खरेदी करतात.

अशोक सराफ यांची संपत्ती किती?

एका मीडिया पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते अशोक सराफ यांची एकूण संपत्ती 37 कोटींच्या घरात आहे. अशोक सराफ अनेक प्रोडक्टसाठी ब्रँड एंडोर्समेंट करताना दिसतात. त्यातून त्यांची बऱ्यापैकी कमाई होते. तसेच मोठ्या पडद्यावर आणि छोट्या पडद्यावर ते साकारत असलेल्या भूमिका याशिवाय नाटकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीला येतात. या वयातही अशोक सराफ तिन्ही माध्यमांमध्ये मोठ्या उत्साहाने काम करताना दिसतात.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ चा निर्णय का घेतला ? पाच मुद्द्यात जाणा
एकीकडे दिल्ली विधानसभांचा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याची बातमी असताना आता शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीला मोठा...
ठाकरे गटाचे एक घाव, दोन तुकडे… स्वबळाचा नारा होताच काँग्रेस बॅकफूटवर? नेत्यांनी काय काय म्हटलं?
बेस्ट चालक बस सुरु ठेऊन नियंत्रण कक्षात गेला अन् बसने पकडला वेग, कुर्लाच्या घटनेनंतर मुंबईत पुन्हा थरार
2000 कोटींची कमाई,आमिर खानसोबत लग्नाच्या अफवा अन् रातोरात स्टार; अभिनेत्रीची चर्चा फारच
उत्तर प्रदेशमधील कन्नौज रेल्वे स्थानकावर छत कोसळलं, अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू
ज्ञानराधा मल्टिस्टेट घोटाळाप्रकरणी सुरेश कुटेंची 1433 कोटींची मालमत्ता जप्त, ED ची मोठी कारवाई
वाल्मीक कराडचा मुलगा सुशीलविरोधात फौजदारी याचिका दाखल; तातडीने सुनावणीची मागणी