प्राजक्ता माळीसाठी मनसे नेता धावला, म्हणाले “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात…”

प्राजक्ता माळीसाठी मनसे नेता धावला, म्हणाले “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात…”

बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधाना यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे प्राजक्ता माळी संतापली आहे. प्राजक्ताने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच मनसेचा एक बडा नेता प्राजक्ताच्या समर्थनार्थ धावला आहे. मनसेच्या नेत्याने ट्विट करत सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून प्राजक्ता माळीचं समर्थन करतानाच आमदार सुरेश धस यांना कानपिचक्या दिल्या आहेत. “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत”, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राजक्ता भूमिका मांडणार

दरम्यान, सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने नावाचा उल्लेख केला, त्या पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. प्राजक्ता माळीने धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्राजक्ता आधी महिला आयोगात तक्रार करून पत्रकार परिषद घेणार की पत्रकार परिषदेनंतर तक्रार करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच प्राजक्ता काय बोलणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले होते धस?

परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप केलं जातं. वाल्मिकी कराडला या इव्हेंट मॅनजमेंटची मोठी हौस आहे. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा, असा उपरोधिक टोला धस यांनी लगावला होता. त्यामुळे प्राजक्ता माळी या संतापल्या असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच एखाद्या गंभीर प्रकरणाच्यावेळी काहीही संबंध नसताना कलाकारांची नावे घेणं कितपत योग्य आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. येथे 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार. निवडणुकीची तारीख...
येत्या रविवारी मेगा ब्लॉकची वेळ काय? घरातून बाहेर पडण्याआधी जाणून घ्या A टू Z माहिती
‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक राऊत
Photo – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण
विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप