BMC निवडणुकीआधी मुंबईत ठाकरे गटासाठी एक चिंता वाढवणारी बातमी

BMC निवडणुकीआधी मुंबईत ठाकरे गटासाठी एक चिंता वाढवणारी बातमी

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे गटाला गळती लागली आहे. ही गळती कशी थांबवायची? बाहेर पडणाऱ्या लोकांना कसं रोखायचं? हेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोरील मुख्य आव्हान आहे. सध्या उद्धव ठाकरे गटातून पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक बाहेर पडल्याच्या दररोज बातम्या येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडणारे बहुतेक जण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आता मुंबईतील माजी नगरसेवक नाराज असल्याची बातमी आली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर ठाकरे गटाचं मातोश्रीवर आढावा बैठकांच सत्र सुरु आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत काय चुकलं? महापालिकेला काय खबरदारी घेतली पाहिजे? यावर मंथन सुरु आहे.

आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे गटासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. पण आता शिवसेना फुटली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे अधिकृत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांना नवीन मशाल चिन्ह घ्यावं लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला घवघवीत यश मिळालं. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. त्याचवेळी उद्धव ठाकरे गटाला फक्त 20 जागा मिळाल्या. एकप्रकारे खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नाच उत्तर मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणाऱ्याचा ओघ वाढला.

BMC निवडणुकीत काय होणार?

आता ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठका पार पडत आहे. पण त्यामध्ये डावलल जात असल्याच माजी नगरसेवकांच म्हणणं आहे. त्यामुळे या माजी नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विश्वासात घेतलं नाही, असं या नगरसेवकांच म्हणणं आहे. मुंबईत ठाकरे गटाचे एकूण 99 माजी नगरसेवक आहेत. त्यातील जवळपास 36 माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता उर्वरित नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. म्हणजे महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर आणखी मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करु शकतात.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बॉलिवूडच्या बड्या हस्तीचं निधन, पण नीना गुप्तांचा श्रद्धांजलीस नकार; म्हणाल्या, त्याने माझ्या… बॉलिवूडच्या बड्या हस्तीचं निधन, पण नीना गुप्तांचा श्रद्धांजलीस नकार; म्हणाल्या, त्याने माझ्या…
विख्यात दिग्दर्शक प्रीतीश नंदी यांचे नुकतेच निधन झाले. बुधवारी 8 जानेवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडमधील अनेकजण...
गौरी नवरा शाहरुख खानचे सर्व चित्रपट फ्लॉप होण्याची देवाकडे सतत प्रार्थना का करायची?
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत 22 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये; अभिनेता म्हणाला ‘लग्न वैगरे…’
तुमचेही काजळ लावल्यानंतर पसरते का? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स
Weightloss Tips: लठ्ठपणामुळे त्रस्त आहात? जेवल्यानंतर ‘या’ गोष्टी करणं टाळा अन्यथा…
हृदयाच्या आरोग्यासाठी कॉफी प्यायची योग्य वेळ कोणती ? तज्ज्ञांचे म्हणणे काय?
हिवाळ्यात कोरडेपणामुळे सतत अंगाला खाज सुटतेय? करा हे घरगुती उपाय लगेच मिळेल आराम