IMD Weather Forecast : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, राज्यावर तिहेरी संकट, आयएमडीकडून धोक्याचा इशारा
राज्यासह देशभरात अचानक थंडीला ब्रेक लागला आहे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस राजधानी दिल्लीसह देशातील अनेक भागांमध्ये मेघ गर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये गारपिटीचा देखील धोका आहे.
गेल्या आठवड्यात देशात कडाक्याची थंडी होती, मात्र उत्तरेकडून येणारं वार आणि समुद्रातील बाष्पयुक्त हवेमुळे वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ वातावरण तयार झालं आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 24 तासांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.सोबतच वादळी वाऱ्याचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. दरम्यान पाऊस, गारपीट आणि वादळ असं तिहेरी संकट पुढील दोन दिवस राज्यावर असणार आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव, नाशिक, आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List