प्रासंगिक – शक्तीच्या देवतेची उपासना

प्रासंगिक – शक्तीच्या देवतेची उपासना

>> मोक्षदा घाणेकर

सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. या महिन्यातील गुरुवारी बहुतांश महिला श्री महालक्ष्मी व्रत करतात. आजचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील अखेरचा गुरुवार असणार आहे. महालक्ष्मी देवीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहावी हा सकाम हेतूही या व्रतामागे दडलेला असतो. शालेय जीवनात ज्ञानार्जन करून आपण श्री सरस्वती देवीची उपासना करत असतो. अनेक महिला आज उच्च शिक्षण घेऊन न्याय, वैद्यक, संशोधन, सैन्य, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. उद्योजक क्षेत्रातही अनेक महिलांनी आज उत्तुंग भरारी घेतली आहे. ज्ञान घेऊन त्यामध्ये पारंगत होणे ही श्री सरस्वती देवीची उपासनाच आहे. शक्तीची अर्थात देवीची तीन प्रमुख रूपे आहेत. त्यांतील श्री सरस्वती आणि श्री महालक्ष्मी या देवीच्या तारक रूपाची उपासना आपण प्रत्येक जण आपापल्या परीने करत असतो; मात्र देवीच्या ज्या रूपाच्या उपासनेची आज नितांत आवश्यकता आहे त्या भक्तांच्या उद्धारासाठी दृष्टांचा संहार करणाऱ्या महाकालीची उपासना महिलावर्ग केव्हा करणार आहे? सध्याची देशाची आणि समाजाची स्थिती पाहता कोणत्याच क्षेत्रात महिला सुरक्षित नाहीत. स्त्री अत्याचारांच्या घटनांमध्ये वर्षागणिक कमालीची वाढ होऊ लागली आहे.   स्त्री अत्याचारावर अंकुश आणण्यासाठी कठोर कायदे करूनही या घटनांमध्ये घट झालेली नाही. सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली. मात्र महिलांच्या सुरक्षेसाठी शासन राबवत असलेल्या योजना केवळ नावाला शिल्लक असल्याने स्त्री अत्याचाराचा आलेख तिळमात्र कमी होताना दिसत नाही.

ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीला मातेसमान मानण्याची शिकवण दिली त्याच छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात स्त्रीची होत असलेली अवहेलना लज्जास्पद आहे. पोलीस प्रशासन असो वा नातेवाईक, सर्वच ठिकाणी स्त्रियांच्या मदतीला धावून येऊ शकत नाहीत. त्यासाठी स्त्रियांनी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. त्यासाठी आपले मन आणि शरीर सततच प्रतिकारक्षम ठेवण्याची गरज आहे. देवीच्या महाकाली स्वरूपात तिच्या प्रत्येक हातात शस्त्र आहे. या शस्त्रांचा वापर करून तिने सज्जनांचे रक्षण आणि दृष्टांचा संहार केला आहे. देवीच्या या रूपाची उपासना आज प्रत्येकी स्त्रीने करायला हवी. राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, राणी चेन्नमा यांनी आपल्या राज्याच्या रक्षणासाठी प्रसंगी शस्त्र हाती घेऊन पराक्रम गाजवला आहे. पराक्रमी स्त्रियांची अशी अनेक उदाहरणे इतिहासात घडून गेली आहेत. त्यांच्यामध्ये कमालीचे मनोधर्य आणि दुर्दम्य इच्छाशक्ती होती. या रणरागिणींचा आदर्श समोर ठेवून समाजात माजलेल्या वासनांध शक्तींचा संहार करण्यासाठी आता प्रत्येक स्त्रीने सज्ज व्हायला हवे. लाठीकाठी, ज्युडो-कराटे आदींचे अद्ययावत प्रशिक्षण घेऊन दृष्ट शक्तींवर प्रहार करण्यासाठी सज्ज व्हायला हवे. स्त्रीची अबला ही ओळख पुसून ती प्रसंगी सबला होऊन रणरागिणीही होऊ शकते हे समाजाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. विद्येची देवता श्री सरस्वती, धनाची देवता श्री महालक्ष्मी यांसोबत येणाऱ्या नवीन वर्षात शक्तीची देवता श्री महाकाली मातेची उपासना करण्याचा संकल्प करूया. जेणेकरून येणाऱ्या काळात राज्यातील स्त्री अत्याचाराचा आलेख उतरलेला असेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्याचं आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख? उद्याचं आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिना उलटला आहे. या प्रकरणात...
नैसर्गिक रित्या बनवा तुमचे केस चमकदार आणि दाट, जाणून घ्या आयुर्वेदिक हेअर केअर टिप्स
एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार! मुंबईत महापालिका निवडणुकीआधी मोठा ट्विस्ट
अटल सेतूला एक वर्षे पूर्ण, वर्षभरात ८३,०६,००९ वाहनांचा प्रवास
उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, शिवसेनेच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी होणार?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठं ट्विस्ट; नवीन एसआयटीची स्थापना, कारण काय?
अमरावतीत ‘मिनी बांगलादेश’? किती लोकांना मिळालं नागरिकत्व; किरीट सोमय्या यांच्या खळबळजनक आरोपाने सर्वच हादरले