बॉलिवूडमध्ये यायची एवढी घाई का? सेटवर बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी रवीना टंडनची लेक ट्रोल

बॉलिवूडमध्ये यायची एवढी घाई का? सेटवर बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणारी रवीना टंडनची लेक ट्रोल

अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘आझाद’ या चित्रपटातून ती अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवतंय. या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील गाण्यांमध्ये राशाने चांगलीच छाप सोडली आहे. तिचं पहिलं गाणंसुद्धा सोशल मीडियावर तुफान हिट होतंय. राशाचा डान्स आणि तिचे हावभाव पाहून ती सर्व स्टारकिड्सना तगडी टक्कर देणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच राशाचा एक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे शूटसाठी राशाचं मेकअप सुरू आहे, तर दुसरीकडे ती समोर पुस्तक ठेवून अभ्यास करताना दिसतेय. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एकीकडे राशा तिच्या शूटिंगसाठी तयार होत आहे, तर दुसरीकडे ती बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठीही तयारी करत असल्याचं दिसून येत आहे. मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टायलिस्ट राशाला सीनसाठी तयार करत आहेत. त्याचवेळी शूटिंगच्या कपड्यांमध्ये आरशासमोर बसलेली राशा लक्ष केंद्रीत करून अभ्यास करताना दिसतेय. जी व्यक्ती तिचा व्हिडीओ शूट करते, तिच तिला विचारते की, “राशा तू शूटिंगसाठी तयार आहेस का? तू हे काय करतेय?” तेव्हा राशा हळूच कॅमेरात बघून हसते आणि सांगते, “मी अभ्यास करतेय.” हे ऐकून ती व्यक्ती आश्चर्य व्यक्त करत म्हणते, “तुझ्या शॉटसाठी जाण्याआधी अभ्यास करतेय का?” त्यावर राशा सांगते, “माझ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी फक्त दहा दिवस उरले आहेत. मी भूगोल वाचतेय.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी राशाच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत. तर काहींनी तिची खिल्लीसुद्धा उडवली आहे. ‘असं वाटतंय अभ्यास करण्याचंही अभिनय करतेय’, असं एकाने लिहिलंय. तर ‘ही बारावीत आहे असं वाटत नाही. असं वाटतंय की तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘इंडस्ट्रीतत यायची इतकी घाई का आहे? आधी शिक्षण तरी पूर्ण कर’, असा सल्ला नेटकऱ्यांनी राशाला दिला. राशाचा पहिला चित्रपट ‘आझाद’ हा येत्या 17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात राशासोबत अमन देवगणसुद्धा भूमिका साकारणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती तक्रार प्रवेश वर्मा यांची निवडणूक आयोग करणार चौकशी, अरविंद केजरीवाल यांनी आचारसंहिता भंगाची केली होती तक्रार
भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन केल्याची तक्रार आम आदमी पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. यातच आता...
युजवेंद्र धनश्रीनंतर आणखी एका क्रिकेटपटूच्या घटस्फोटाच्या चर्चा, पत्नीसोबतचे फोटो केले डिलिट
‘सरडा रंग बदलतो, पण अशी नवीन जात…’, एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना डिवचले
‘महिला आयोगावर कचकड्या भावल्या बसवल्यामुळं…’ पुण्यातील ‘त्या’ प्रकरणावरून अंधारेंचा चाकणकरांना टोला
‘एवढा मोठा माणूस असं बोलतोय…’, L&T कंपनीच्या चेयरमनच्या 90 तासांच्या वक्तव्यावर दीपिका पदुकोण भडकली
खो-खोच्या राष्ट्रीय संघांमध्ये महाराष्ट्राचा बोलबाला, पुरुषांच्या कर्णधारपदी प्रतिक वाईकर तर महिलांच्या कर्णधारपदी प्रियांका इंगळे
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर सुरु करा, अन्यथा गोरखपूर गाडी थांबवणार – विनायक राऊत