सलमान खानने सर्वांसमोर स्वत:ला चाबकाचे फटके मारले; सेटवरील सगळे पाहतच बसले

सलमान खानने सर्वांसमोर स्वत:ला चाबकाचे फटके मारले; सेटवरील सगळे पाहतच बसले

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान सध्या बिष्णोईच्या प्रकरणावरून चर्चेत आहे. तसेच त्याच्या खाजगी आयुष्यातील काही प्रसंगामुळेही तो चर्चेत असतो. सलमान खान 27 डिसेंबरला 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. सलमानचे चाहतेही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सलमानचा व्हिडीओ व्हायरल 

दरम्यान सलमान खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्वतःला चाबकाचे फटके मारताना दिसत आहे आणि त्याच्या फिल्मच्या सेटवर. सलमानने केलेले हे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.

सलमान खान इन्स्टाग्रामवर नेहमीच ॲक्टिव्ह असतो. तो त्याच्या चित्रपट आणि आयुष्याशी संबंधित अनेक अपडेट्स शेअर करत असतो. काही वर्षांपूर्वी सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो स्वत:ला फटके मारताना दिसत होता. सलमानचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहतेही हैराण झाले. होते. हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

सलमानने स्वतःला चाबकाचे फटके का मारले?

सलमान खानने शेअर केलेला व्हिडिओ 2019 मध्ये रिलीज झालेल्या त्याच्या ‘दबंग 3’ चित्रपटाच्या सेटवरील होता. व्हिडिओमध्ये सलमान खान पहिल्यांदा पोतराज समाजाच्या लोकांशी बोलताना दिसत आहे. सलमान पोतराज समाजातील लोकांना स्वत:ला फटके मारताना पाहतो, त्यानंतर तो स्वतःही असे करण्याची इच्छा व्यक्त करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

तसेच सलमान खान पोतराजाला चाबकामधून येणाऱ्या आवाजाबद्दलही विचारतो. तेव्हा तो सलमानला सांगतो की या चाबकाला जेव्हा जोरात मारतो तेव्हा त्याच्यातून हा आवाज येतो. हे पाहून सलमानही त्याच्याकडून तो चाबूक घेऊन स्वत:वर तो प्रयोग करतो.

सलमान आधी त्या पोतराजाला त्या चाबकाबद्दल आणि ते कसं पकडायचं किंवा फटके मारून घेताना कशापद्धतीने त्याचा वापर करायचा असं सगळं विचारून तो खरोखरच चाबकाचे फटके मारून घेतो. जेव्हा सलमान खान चाबकाचे फटके मारून घेतो तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं.सेटवरील सर्वजन अगदी थक्क होऊन पाहत राहतात.

सलमानचे धाडस पाहून लोकांनी वाजवल्या टाळ्या

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सलमान खान प्रथम स्वत:च्या हातावर मारतो आणि म्हणतो की चाबकाचा आवाज येत नाही. यानंतर सलमान खानने चाबूक धरला आणि पूर्ण ताकदीने स्वतःला मारायला सुरुवात करतो आणि त्याला अपेक्षित असणारा आवाजही त्या चाबकातून येतो.

शेवटी सलमान चाबूक पोतराजाला परत करतो आणि त्याच्याशी हातही मिळवतो तसेच त्यांच्यासोबत फोटोही काढतो. दरम्यान सलमानने केलेलं धाडसं पाहून गर्दीतील लोकही टाळ्या वाजवायला लागतात. हा व्हिडीओ शेअर करताना सलमानने लिहिले होते की, “त्यांच्या वेदना शेअर करण्यात आणि अनुभवण्यात एक वेगळीच भावना आहे. “बच्चा पार्टी, हे कधीही स्वतःवर करून पाहू नका.” असं लिहित त्याने या लोकांबद्दलचे प्रेम व्यक्त केलं होतं.

सलमान खान वर्कफ्रंट
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं तर सलमान लवकरच सिकंदरमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमान खानचा सिकंदर चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जाते.

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

EWS Certificate : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ EWS Certificate : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासाठी दोन महिने मुदतवाढ
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला. राज्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना SEBC (मराठा) कोट्या अंतर्गत...
New Year Celebration : 31 ला पार्टी करताना टल्ली होण्याचा प्लान ? पण 4 पेगपेक्षा अधिक दारू मिळणार नाही..
कधी आपल्या सणांचे फोटो टाकलेस का? विचारणाऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकारचं सडेतोड उत्तर
‘देशाने एक महान नेता गमावलाय..’; मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
पनवेल फार्महाऊसपासून गॅलेक्सी अपार्टमेंटपर्यंत.. सलमानकडे तब्बल एवढी संपत्ती; आकडा ऐकून डोळे विस्फारतील!
जतमध्ये श्री यल्लमा देवीच्या यात्रेला सुरुवात, महाराष्ट्रासह परराज्यांतील भाविकांची गर्दी
चासनळीत साकारतेय देशातील पहिली ‘श्रीरामसृष्टी, पहिल्या देखाव्याचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण