पावणे नऊ लाखांचे हेरॉईन जप्त 

पावणे नऊ लाखांचे हेरॉईन जप्त 

पावणे नऊ लाख रुपयांचे हेरॉईन तस्करीप्रकरणी एकाला बोरिवली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. परवेझ अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बोरिवली परिसरात काही जण हेरॉईन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पोलिसांनी पडताळली. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, उपनिरीक्षक इंद्रजित पाटील, निंबाळकर, फर्डे, भोई आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी रविवारी रात्री सुधीर फडके उड्डाण पूल येथे सापळा रचला. रात्री परवेझ तेथे आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 87 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत सुमारे पावणे लाख रुपये इतकी आहे. परवेझ हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी असून तो सध्या नालासोपारा येथे राहतो. त्याला ते हेरॉईन कोणी दिले होते याचा तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी कुठे पळून जातेय का? विमानप्रवासादरम्यान अरबाजच्या ‘त्या’ कृतीवर पत्नीची पोस्ट मी कुठे पळून जातेय का? विमानप्रवासादरम्यान अरबाजच्या ‘त्या’ कृतीवर पत्नीची पोस्ट
अभिनेता अरबाज खानने 2023 मध्ये मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसऱ्यांदा लग्न केलं. सुरुवातीला माध्यमांपासून चार हात लांब राहणारी शुरा आता...
एक खून.. अनेक आरोपी.., रहस्याचा अविस्मरणीय गोड अन् गूढ थरार; ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर
विवाहित असून पार्टनरपासून वेगळे राहतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी
‘तारक मेहता..’मधील रोशन सोढीची प्रकृती बिघडली; रुग्णालयातून शेअर केला व्हिडीओ, चाहत्यांकडून काळजी व्यक्त
महसूल कार्यालयात 100 टक्के ई-ऑफिस प्रणाली, नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी अॅक्शन मोडवर
शहरी गरीब योजनेची धावाधाव थांबणार; लाभार्थी वाढणार, आशा वर्कर्स करणार सर्वेक्षण
पंधराशे नको, सुरक्षा द्या ! शिक्रापूर-चाकण मार्गावर झालेल्या अपघाताप्रकरणी ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन