गाव तसं चांगलं… इथं प्रत्येक गावकऱ्याला मिळतं संगीतमय नाव
मेघालयात असे एक गाव आहे, जिथे लोक एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, तर एका विशिष्ट सुराने किंवा विशिष्ट धूनने हाक मारतात. म्हणूनच या गावाला व्हिसलिंग व्हिलेज असे म्हणतात. या गावाचे नाव कोंगथाँग असे आहे. मेघालयाची राजधानी शिलाँग येथून ते 60 किलोमीटर अंतरावर आहे. तेथील गावकरी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी व्यक्तीच्या नावाऐवजी शिट्टी वाजवतात. कोंगथाँगच्या गावकऱ्यांनी या टय़ूनला जिंगरवाई लोबेई म्हणजे आईचे प्रेमगीत असे म्हटलेय. बाळाचा जन्म झाल्यावर त्याची आई एक विशेष टय़ून तयार करते. ती विशेष टय़ून फक्त बाळाला संबोधण्यासाठी असते. तीच बाळाची पुढे ओळख बनते. कोंगथाँग गावात पिढय़ान्पिढय़ाची ही परंपरा आहे. कोंगथाँग गावची लोकसंख्या सुमारे 700 आहे. गावातील प्रत्येकाची स्वतःची अशी एक धून आहे. म्हणजेच कोंगथाँग गावात 700 धून आहेत.
प्रत्येकाला एक विशिष्ट संगीत धूनच्या माध्यमातून संबोधणे ही कोंगथाँग गावाची परंपरा आहे. दूर अंतरावरील व्यक्तीला हाक मारण्यासाठी विशिष्ट धून शिट्टीच्या माध्यमातून वाजवली जाते. हे गाव दुर्गम, घनदाट जंगलाचे आहे. त्यामुळे संवाद साधण्यासाठी या टय़ूनचा उपयोग होतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List