अनियंत्रित बस दरीत कोसळली, चार प्रवाशांचा मृत्यू; अनेक जण जखमी
अनियंत्रित बस 30 फूट दरीत कोसळून चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मुंडक्कयम येथे सोमवारी सकाळी 6.15 वाजता हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन पथक, पोलीस आणि अग्नीशमनदल घटनास्थळी दाखल झाले.
बसमध्ये 34 प्रवासी आणि तीन कर्मचारी होते. सर्व प्रवासी अलाप्पुझा जिल्ह्यातील मावेलिकारा येथील रहिवासी असून तामिळनाडूतील तंजावर येथे गेले होते. तेथून परतत असताना डोंगरी जिल्ह्यातील पुल्लुपाराजवळ एका वळणावर बसचे नियंत्रण सुटल्याने बस 30 फूट दरीत कोसळली.
अपघातात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. आपत्कालीन पथक आणि अग्नीशमन दलाने चारही मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List