दारू प्यायल्यानंतर शरीरात कुठे जमा होते अन् किती वेळ राहते? दारूला पचायला लागणारा वेळ जाणून थक्क व्हाल
नुकतंच 31st च्या सर्वांनी भरपूर पार्ट्या केल्या असतील. एवढच नाही तर त्या दिवशी सर्वात जास्त विक्रि झालेली गोष्ट म्हणजे मद्य आणि बर्फ. या दोन्ही गोष्टींना ऑनलाइन आणि दुकानांमध्येही प्रचंड मागणी होती. फक्त 31stच नाही तर कोणत्याही पार्टीमध्ये किंवा सेलिब्रेशनमध्ये दारुही असतेच. अनेकजण सेलिब्रेशन म्हणून मद्याचं सेवन करतात.
शरीरातील कोणत्या भागात जमा होते दारू?
पण तुम्हाल माहितीये का की दारू प्यायल्यानंतर ती नक्की किती वेळ शरिरात राहते आणि कोणत्या भागात जमा होते. 90 टक्के लोकांना माहित नसेल. दारू प्यायल्यानंतर हळूहळू नशा चढू लागते, आवाज बदलतो, शरीरावरील नियंत्रणही सुटतं. काही वेळाने दारूची नशा उतरते, तसं सर्वकाही नॉर्मल होतं. पण दारू शरीरात किती वेळ राहते याचा विचार कदाचितच कोणी केला असेल.
दारू प्यायल्यानंतर शरीरात ती किती वेळ राहते?
दारू प्यायल्यानंतर शरीरात ती किती वेळ राहते, त्याचा प्रभाव किती काळ दिसून येतो हेच मुळात बऱ्याच जणांना माहितच नाहीये. जसे इतर पदार्थ खाल्ल्यावर किंवा कोणतेही लिक्वीड प्यायल्यावर ते पचायला एक ठराविक वेळ लागतो.
मग ते पदार्थ साधा डाळ-भात, भाजी-पोळी असो किंवा चिकन, मटण, मासे असे मांसाहार असो. यातील प्रत्येक पदार्थाची पचण्याची वेळ ठरलेली असते. त्याबद्दल आपल्याला कल्पना आहेच.
दारूला पचायला किती वेळ लागतो?
दारू प्यायल्यावर मात्र बहुतेक जणांचा असा समज आहे की दारू लघवी, घामावाटे सर्व निघून जाते मग ती शरीरात राहतच नाही. पण तसं नाहीये. दारूला देखील पचायला वेळ लागतो. काही प्रमाणात ही दारू शरीरात गेल्यावर एका भागात साचून राहते आणि मग तिची पचन होण्याची प्रक्रिया सुरु होते.
जेव्हा कुणी दारू पितं तेव्हा शरीरात गेल्यानंतर ती 30 सेकंदांनंतर रक्तप्रवाहात मिसळते आणि संपूर्ण शरीरात पसरत जाते. पोटात गेल्यानंतर काही वेळाने घाम आणि श्वासोच्छवासामार्फत बाहेर किंवा लघवीवाटे ती बाहेर फेकली जाते.
90 टक्के दारू लिव्हरमध्ये राहते
पण काही प्रमाणात ती दारू पोटात राहते. पोटात राहिलेल्या दारूपैकी 90 टक्के दारू लिव्हर आणि आतड्यांमध्ये जमा होते आणि नंतर तिचं पचन सुरू होतं.
रिपोर्टनुसार दारू प्यायल्यानंतर ती 72 तासांपर्यंत शरीरात राहते पण दारू शरीरात किती वेळ राहते हे दारूचं प्रमाण, गुणवत्ता आणि पिण्याची पद्धत इत्यादींवरही अवलंबून असतं. शिवाय चाचणीनुसारही ही वेळ बदलते.
जसं की, रक्त तपासणीत दारूचं प्रमाण 6 तासांपर्यंत कळतं, श्वासोच्छवासाच्या तपासणीत 12 ते 24 तास, लघवीच्या चाचणीत 72 तास, लाळेच्या चाचणीत 12 ते 24 तास दारूचं प्रमाण कळतं.
दारूलाही पचायला एक काळ द्यावा लागतो
त्यामुळे दारूलाही पचायला एक काळ द्यावा लागतो हे आता बऱ्याच जणांना समजलं असेलच. म्हणूनच नियमित दारू पित असाल तर ते नक्कीच शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
त्यामुळे नियमित असेल किंवा सेलिब्रेशनसाठी असेल आपल्या शरीराची काळजी घेणे फार महत्वाचं आहे. कारण 12 ते 13 कप चहाही वाईट आणि चमचाभर विस्किही ओषध म्हणून उपयोगी ठरते अस म्हटलं जातं. त्यामुळे कोणताही त्रास असेल, आजार असले तर शक्यतो मद्यप्राशन करणं टाळलच पाहिजे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List