सोसायटीच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा नोंदवणार, हायकोर्टात वरळी पोलिसांची माहिती, नियमबाह्य दुकाने खरेदी केल्याचा आरोप
वरळीतील एका सोसायटी अध्यक्षाने इमारतीतील दुकानांची नियमबाह्य खरेदी केली. लाखो रुपयांची ट्रान्सफर फी दिली नाही, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या आरोपाचा गुन्हा नोंदवणार असल्याची माहिती वरळी पोलिसांनी न्यायालयात दिली.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. शिवकुमार डीगे यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली. या आरोपाची तक्रार 3 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानुसार याचा गुन्हा नोंदवला जाईल, असे अतिरिक्त सरकारी वकील विठ्ठल कोंडे-देशमुख यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
राजेंद्र सीताराम देसाई यांनी अॅड. कुलदीप पाटील यांच्यामार्फत ही याचिका केली होती. पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त (गुन्हे), वरळी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, भीमा वैतरणा वरळी सागर को-ऑप. हौ. सोसायटी यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते. या सोसायटीचे अध्यक्ष सतीश चतुर्वेदी यांच्याविरोधात देसाई यांनी हा आरोप केला होता.
पारदर्शक तपास करा
वरळी पोलिसांनी याचा पारदर्शक तपास करून गुह्याची उकल करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
नियम सर्वांना समान हवेत
आता सोसायटीमार्फत खरेदी-विक्रीसाठी तीन लाख रुपये ट्रान्सफर फी म्हणून घेतले जातात. हा नियम सर्वांना लागू व्हायला हवा. चतुर्वेदी यांनी ट्रान्सफर शुल्क भरले नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.
काय आहे प्रकरण
फ्लॅट व दुकानाची विक्री होताना जिल्हाधिकारी व सोसायटीला ट्रान्सफर चार्जेस द्यावेत लागतात. भीमा वैतरणा वरळी सागर सोसायटीचे 16 दुकानांची खरेदी वरळी सागर सोसायटीचे अध्यक्ष सतीश चतुर्वेदी यांच्या कंपनीने केली. या खरेदीत नियमांचे उल्लंघन करण्यात आले. याचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
मध्य रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या निवडणुकीत शिवसेनाप्रणीत रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आघाडीने दणदणीत विजय मिळवला. रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीतील दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. या वेळी रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वाजपेयी आणि त्यांचे सहकारी तसेच इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List