नववर्षात मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना दणका, 17800 जणांवर कारवाई; दंडामुळे सरकारी तिजोरीत भर

नववर्षात मुंबईत बेशिस्त वाहनचालकांना दणका, 17800 जणांवर कारवाई; दंडामुळे सरकारी तिजोरीत भर

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारी तिजोरीत मोठी भर पडली आहे. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, नववर्षाचे स्वागत करताना नियम मोडल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी तब्बल 17800 वाहनचालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईवेळी ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेतून सरकारी तिजोरीत 89.19 लाख रुपये जमा झाले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांनी 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून ते बुधवारी पहाटेपर्यंत संपूर्ण शहरात केलेल्या बंदोबस्तावेळी बेशिस्त वाहनचालकांनावर ही कारवाई केली आहे.

मद्य प्राशन करून वाहन चालवणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे आणि नो-एंट्रीत प्रवेश करणे, अशा घटनांमध्ये कारवाई करून दंड आकारण्यात आल्याचे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. वेग मर्यादा न पाळल्याने अनेक दुचाकीस्वारांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच अनेक चारचाकी वाहनचालकांना सीट बेल्ट न लावल्यानेही दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल फोनवर बोलत असल्याचे आढळून आल्यानेही अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी एकूण 89 लाख 19 हजार 750 रुपयांचा दंड वसूल केला. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, वांद्रे बँडस्टँड आणि जुहू चौपाटीसह मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्रात मराठी कलाकारांवर अन्याय का? दादासाहेब फाळकेंना भारतरत्न न देण्यावरून बाबासाहेब पाटलांची नाराजी महाराष्ट्रात मराठी कलाकारांवर अन्याय का? दादासाहेब फाळकेंना भारतरत्न न देण्यावरून बाबासाहेब पाटलांची नाराजी
दादासाहेब फाळके यांचा ‘भारतरत्न’साठी विचार का केला नाही? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्या अशी मागणी...
पार्टीत धर्मेंद्रने या कलाकाराच्या कानशिलात लगावली, नंतर थेट…
तब्बल 49 वर्षांनंतर ‘शोले’ चित्रपटातून हटवलेला ‘तो’ सीन व्हायरल, फोटो आले समोर
माझं त्याच्याशी काही घेणं-देणं नाही, गोविंदाची पत्नी अजूनही नाराज ?, कृष्णाबाबत म्हणाली…
EPFO खातेधारकांसाठी खुशखबर! नवीन वर्षात मिळणार ATM आणि मोबाईल अ‍ॅपची सुविधा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी? सुप्रिया सुळे यांचा सवाल
Santosh Deshmukh Case – सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला कोणी आश्रय दिला? सुरक्षा कोणी दिली? अंबादास दानवे यांचा सवाल