‘पैसे देऊन, वर आपला जीव मुठीत घेऊन..’; रील्स बघत रिक्षा चालवणाऱ्यावर भडकली प्रसाद ओकची पत्नी

‘पैसे देऊन, वर आपला जीव मुठीत घेऊन..’; रील्स बघत रिक्षा चालवणाऱ्यावर भडकली प्रसाद ओकची पत्नी

रिक्षाचालकांच्या मुजोरीपणाच्या अनेक तक्रारी आपल्याला ऐकायला मिळतात. कधी प्रवास नाकारतात तर कधी जवळच्या अंतरावर जाण्यास नकार देतात. अशातच अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ पोस्ट करत वेगळीच तक्रार केली आहे. मंजिरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक त्याच्या मोबाइल फोनमध्ये रील्स आणि व्हिडीओ बघत रिक्षा चालवताना दिसतोय. यावरून मंजिरीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर दोन वेळा सांगूनही संबंधित रिक्षाचालकाने रील्स बघणं बंद केलं नाही. अखेर नाईलाजाने मंजिरीने रिक्षाच बदलली. हा संपूर्ण प्रकार तिने या पोस्टमध्ये सांगितला आहे.

मंजिरी ओक यांची पोस्ट-

‘पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन असा प्रवास का करायचा? आणि यावर यांना काही बोलायचं नाही. कारण यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल. दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली आणि तरी ही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल, समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन. पण मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांने मला… एकूणच कठीण आहे सगळं. देव त्याला अक्कल देवो,’ अशा शब्दांत मंजिरीने संताप व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjiri Oak (@manjiri_oak)

मंजिरीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सहमत आहे, हा प्रकार वाढलाय आणि यांची अरेरावी पण’, असं एका युजरने म्हटलंय. तर ‘रिक्षाचा नंबर आणि त्याचा व्हिडीओ पोलिसांना किंवा आरटीओला पाठवा. खूप लोकांनी हे केलं तर काहीतरी कारवाई होईलच’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘असाच अनुभव मलाही आला. मीसुद्धा संबंधित रिक्षाचालकाला मोबाइल बंद करायला सांगितलं’, असं एका युजरने म्हटलं आहे. ‘ठाण्यात हे जास्त झालंय आजकाल. ठाणे स्टेशनपासून जाणाऱ्या सर्व रिक्षाचालक सर्रास मोबाइल वापरतात’, अशी तक्रार आणखी एका नेटकऱ्याने केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
मानवी मेटान्यूमो व्हायरसबद्दल (HMPV) जगभरात अलर्ट आहे. हा विषाणू सध्या चीनमधून भारत आणि इतर काही देशांमध्ये पसरला आहे. त्याच्या वाढत्या...
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री
…तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
जया बच्चन हजारोंसमोर सुनेबद्दल असं काही बोलल्या,ते ऐकून ऐश्वर्याला रडू आलं, व्हिडीओ व्हायरल
कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय बीडीडीतील इमारतीचे पाडकाम का केले? आदित्य ठाकरे यांचा सवाल