पृथ्वीतलावर पर्यावरणीय ‘आणीबाणी’ची स्थिती
आपल्याकडे वृक्षलागवड खूप आवश्यक आहे. मात्र फॉरेस्ट आणि प्लांटेशन यात फरक आहे. वृक्षलागवडीमुळे जंगले तयार होऊ शकत नाहीत. ती वनशेती असते. जंगल हे हजारो वर्षांच्या एकत्रित पर्यावरणाच्या परिणामांचा भाग असते. ते वर्षभरात तोडून टाकता येते, पण निर्माण करता येत नाही. म्हणून मूळचे शिल्लक जंगल तुटू नये यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सातत्याने वृक्षलागवड करण्याची आवश्यकता आहे. आज मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीतलावर पर्यावरणाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. पर्यावरणीय आणीबाणी निर्माण झालेली आहे, असे मत ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी व्यक्त केले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) तर्फे आळंदी येथे आयोजित आठव्या पर्यावरण संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. आयोजक संस्था ही प्रमुख ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आळंदीतील देवीदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर येथे संपन्न झालेल्या एकदिवसीय संमेलनप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटन संस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, पर्यावरण सल्लागार डॉ. प्रमोद मोघे, महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी अॅड. प्रभाकर तावरे, देवीदास धर्मशाळेचे अध्यक्ष निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे उपस्थित होते.
महाजन म्हणाले, भारतीय संस्कृती मानवाला प्राणी म्हणून संबोधते. पाश्चात्य राष्ट्रांची विकासनीती आणि निसर्गनीती याच विचारावर आधारित आहे. पाश्चात्य राष्ट्रांत पर्यावरणाचे नुकसान होण्याला हा विचार कारणीभूत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List