राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात याचिका करणार

राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात याचिका करणार

विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने सर्व नियम धाब्यावर बसवत निवडणूक घेतली. तर प्रोग्रॅम सेट करून व्हीव्हीपॅटच्या मदतीने मतदानात छेडछाड करता येऊ शकते, असा दावा ईव्हीएमसारख्या मशीनच्या प्रात्यक्षिकात पुढे आले आहे. त्यामुळे याविरोधात राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणुकीतील सर्व पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यायालयीन लढय़ात शिवसेना आणि काँग्रेस यांनाही बरोबर घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

विधानसभा निवडणूक निकालात मतांमध्ये हेराफेरी झाल्याचे आरोप झाले होते. या चोरीबाबत आणि एकूणच यंत्रणेच्या कारभाराबाबत थेट प्रात्यक्षिकही माध्यमातून सखोल चर्चा करण्यासाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुण्यात घेतले. या चर्चासत्रात निवडणूक आयोगाने यंत्रणेच्या कारभारावर आक्षेप नोंदवले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा फौजिया खान, प्रवक्त्या विद्या चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. अॅड. महमूद प्राचा यांनी या वेळी मार्गदर्श केले. निवडणुकीनंतर उच्च न्यायालयात जाण्यासाठी 6 जानेवारी ही मुदत आहे. त्यापूर्वी याचिका दाखल केली जाणार आहे.

मतदान चोरीचे प्रात्यक्षिके राज्यभर दाखवणार

मतदान यंत्रातून मतदानाची चोरी होते, ते सहज शक्य आहे. याची प्रात्यक्षिके राज्यभर घेऊन जाणार आहोत. प्रोग्रॅम सेट करून व्हीव्हीपॅटच्या मदतीने आणि व्हीव्हीपॅटमध्ये बसविण्यात आलेल्या सेन्सरद्वारे मतांची चोरी करता येणे शक्य आहे. तसा प्रोग्रॅम बसविता येतो. त्यासाठी एव्हीएम मशीनसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्याची गरज नाही, असा दावा ईव्हीएम हटाव सेनेचे पदाधिकारी अमित उपाध्याय यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित चर्चासत्रात प्रत्याक्षिक दाखवून केला. मात्र या वेळी त्यांनी ईव्हीएम मशीन हॅकिंग अथवा या गोष्टींचे समर्थन करण्यास नकार दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हापूस तर हापूस केसरने पण भाव खाल्ला,पहिली पेटी वाशीत मार्केटला आली हो…किंमती किती पाहा हापूस तर हापूस केसरने पण भाव खाल्ला,पहिली पेटी वाशीत मार्केटला आली हो…किंमती किती पाहा
फळांचा राजा आंबा न आवडणारी व्यक्ती विरळच.. आंबा त्यात हापूस आंब्याचा सुंगध जरी सुटला तरी अस्सल खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते....
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार? कोण-कोण उपस्थितीत राहणार? उद्धव ठाकरे म्हणाले….
कारमध्ये रडत होती आलिया भट्ट? रणबीरने रागाने पापाराझीला ओढले अन्…, व्हिडीओ व्हायरल
लेक आराध्याच्या पार्टीत अभिषेकने असं काही केलं की,चाहते म्हणाले “हे फक्त एक बापच करू शकतो”
मधुमेह असलेल्यांनी आवश्य खा ही पाच फळे, रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात
Video – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण – उद्धव ठाकरे
Tata Mumbai Marathon – धावपटूंची मांदियाळी, 60,000 हून अधिक स्पर्धक नशीब आजमावणारं