हिंदुहृदयसम्राटांचं जनतेविषयीचं प्रेम आणि प्रेरणा देणारं स्मारक बनणार, पहिला टप्पा पूर्ण – उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राटांचं जनतेविषयीचं प्रेम आणि प्रेरणा देणारं स्मारक बनणार, पहिला टप्पा पूर्ण – उद्धव ठाकरे

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचं पहिल्या टप्यातील काम पूर्ण झालं आहे. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, ”हिंदुहृदयसम्राट यांचं जनतेविषयीचं प्रेम आणि प्रेरणा देणार स्मारक बनणार असून याच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे.” या पत्रकार परिषदेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि नेते सुभाष देसाई हे देखील उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ”गेली काही वर्षे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू आहे आणि चर्चाही. आर्किटेक आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. हे काम आता छान वाटत असलं तरी, हे काम फार जिकिरीचं होतं. सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी या स्मारकाच्या कामाबद्दल आणि या जागेच्या महत्त्व सांगितलं. यातच आणखी एक योगायोग म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं स्मारक सुद्धा बाजूलाच आहे. या महापौर बंगल्याला आम्ही फक्त एक वास्तू म्हणून बघत नाही तर, त्या वास्तूमध्ये एक भावनात्मक बंधनामध्ये आम्ही जोडले गेलेलो आहोत. शिवसेनेचे चार महापौर या वास्तूमध्ये राहिले होते. शिवसेनाप्रमुखांच्या आणि युतीच्या अनेक महत्त्वाच्या बैठका येथे झाल्या आहेत.”

उद्धव ठाकरे म्हणाले, ”महापौर बंगला ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता, याचं वैभव जपून काम करणं खूप कठीण होतं. हेरिटेज म्हटल्यानंतर काही नियम असतात, यात सीआरझेडचा कायदाही होता. यानंतर आर्किटेक आभा लांबा यांनी सुचवलं की, आपण भूमिगत स्मारक करूया. हे बोलायला सोप्प आहे. मात्र, पाठी समुद्र असल्याने त्याचा रेटा जमिनीच्या खालून सुद्धा खूप मोठा असतो. काही वर्षांपूर्वी आपण येथे संयुक्त महाराष्ट्राचं दालन केलं. ते दालन झाल्यानंतर सुद्धा तिथे वारंवार रिपेरिंगची गरज लागली. कारण समुद्राचं पाणी तिथे सगळ्या मर्यादा ओलांडून येत होतं. ती खबरदारी घेणं आणि त्यानंतर ही वास्तू उभी करणं, हे फार जिकिरीचं काम होतं. म्हणून मी आर्किटेक आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट या कंपनींना धन्यवाद देतोय की, त्यांनी अत्यंत देखणं असं काम वेळेमध्ये टप्पा एक पूर्ण करून दिलं आहे.

‘मी कपाटातला माणूस नाही, मी मैदानावरचा माणूस’

स्मारकाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चार भिंती किंवा नुसता पुतळा म्हणजे स्मारक होत नाही. टप्पा दोनच्या कामाला आता सुरुवात होईल. या स्मारकात शिवसेनाप्रमुखांचा संपूर्ण जीवनपट पाहायला मिळेल. हा जीवनपट म्हणजे गुप्त असं काही नाही. शिवसेनाप्रमुखांनी कधी आत्मचरित्र लिहिलं नाही. त्यांना अनेकदा प्रश्न विचारला जायचा की, तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाही? यावर त्यांचं उत्तर असायचं की, मी कपाटातला माणूस नाही, मी मैदानावरचा माणूस आहे. यामुळेच त्यांचं आयुष्य हे उघडं पुस्तक होतं. मात्र, हे नुसतं मांडणं म्हणजे सुद्धा स्मारक नाही. मी असा विचार केला की, शिवसेनाप्रमुखांचं स्मारक असं झालं पाहिजे की, शिवसेनाप्रमुखांनी आयुषभर जे महाराष्ट्र, देश आणि देशातील हिंदूंना दिलं, तेच काम त्यांच्या स्मारकाने सुद्धा पुढचे अनेक वर्ष केलं पाहिजे. त्याच दृष्टीने आम्ही या संपूर्ण स्मारकाचा टप्पा दोनचा आराखडा तयार केला आहे. यात कुठेही काही गडबड नको म्हणून टेंडर प्रोसिजर पूर्ण केली आहे.”

’23 जानेवारी 2026 च्या आत स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न’

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ”सुभाष देसाई यांनी सांगिल्याप्रमाणे, पुढच्या 23 जेनेवारीपासून शिवसेनाप्रमुखांच्या शताब्दीचे वर्ष सुरू होईल. यातच आम्ही पूर्ण ताकदीने 23 जानेवारी 2026 च्या आत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी आणि त्यांचं पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणारं स्मारक होईल, असा प्रयत्न करत आहोत. आता टप्पा दोनच्या आराखड्याचं काम पूर्ण झालं असून कुठे, काय, कसं येणार याची सुद्धा तयारी झाली आहे. मात्र, शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता. शिवसेनाप्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे, आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी, काही जुने फोटो असतील, भाषणे असतील तर, त्या आम्हाला आणून द्यावी, असं मी जनतेला आवाहन करतो. तसेच पत्रकारांनाही विनंती करतो की, आपल्या कार्यलयात त्या काळातील काही बातम्या असतील, ज्यात त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या घटना आहेत, त्यांचे फोटो किंवा बातम्या आणि लेख असतील, हे कृपा करून आमच्याकडे आणू द्यावीत. जेणेकरून पुढच्या पिढीसाठी ते उद्बोधक असं साहित्य ठरेल.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा ‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सामान्य मुलींपर्यंत अनेकींना असे अनेक प्रसंग आलेले आहेत जे भयानक असतात. जसं की गर्दीच्या ठिकाणी किंवा बस,...
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक राऊत
Photo – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण
विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Video – सहा ते आठ महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पूर्णत्वास नेण्याच्या आमचा प्रयत्न असेल – आदित्य ठाकरे
आता पुरुष दिसणार अधिक स्मार्ट आणि हँडसम!