Solapur News – कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्यांवर राज्य वस्तू व सेवा कर विभागाची धडक कारवाई

Solapur News – कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्यांवर राज्य वस्तू व सेवा कर विभागाची धडक कारवाई

सोलापूरमध्ये कर चोरी आणि फसवणूक करणाऱ्या MSRL ऑईल इंडिया प्रा.लि सोलापूरच्या दोन्ही संचालकांवर राज्य वस्तू व सेवा कर विभागाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर प्रणालीच्या विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि विभागाच्या संकेत स्थळावरील उपलब्ध माहितीद्वारे करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना एका व्यापाऱ्याने अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय मिळविलेल्या खोट्या खरेदी देयकांद्वारे वस्तू व सेवा कर बुडविल्याचे उघड झाले आहे. या व्यापाऱ्यांना अटक करण्यात आले असून 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

श्रीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 35) आणि लक्ष्मीकांत सुरेंद्र लड्डा (वय वर्ष 37) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही MSRL ऑईल इंडीया प्रा. लि. सोलापूर चे संचालक आहेत. यांनी अनेक बनावट कंपन्याकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे 80.18 कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे 10.83 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन त्याद्वारे वस्तू व सेवा कर रुपातील महसूल बुडविला असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर दोघांनाही 08 जानेवारी 2025 रोजी, राज्य वस्तू व सेवा कर विभाग सोलापूर यांनी वस्तू व सेवा कर कायदा 2017 अंतर्गत अटक केली आहे. मुख्य न्याय दंडाधिकारी, सोलापूर यांनी आरोपींना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून ही संपूर्ण कारवाई राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांच्या नेतृत्वाखाली व राज्यकर उपायुक्त रविंद्र गायकवाड यांनी सहायक राज्यकर आयुक्त तसेच राज्यकर निरीक्षक यांच्या पथकासह अपर राज्यकर आयुक्त किरण नदिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाने, आजपर्यंत सदरील 12 व 13 व्या अटकेसह मोठ्या प्रकरणात अटक केल्या आहेत. यामुळे खोटया व बनावट कागदपत्रांच्या आधारे वस्तू व सेवा कराच्या करचोरीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना एक ठोस इशारा मिळाला आहे. राज्य वस्तू व सेवा कर विभाग अशा प्रकारच्या गुन्ह्यात सामील असणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही असे, राज्यकर सहआयुक्त सुधीर चेके यांनी ठणकावून सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा ‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
बॉलिवूड अभिनेत्रींपासून ते सामान्य मुलींपर्यंत अनेकींना असे अनेक प्रसंग आलेले आहेत जे भयानक असतात. जसं की गर्दीच्या ठिकाणी किंवा बस,...
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक राऊत
Photo – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण
विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
Video – सहा ते आठ महिन्यात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक पूर्णत्वास नेण्याच्या आमचा प्रयत्न असेल – आदित्य ठाकरे
आता पुरुष दिसणार अधिक स्मार्ट आणि हँडसम!