प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारने 2 मेट्रो मजुरांना उडवलं; एकाचा मृत्यू, अभिनेत्रीही गंभीर जखमी

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या कारने 2 मेट्रो मजुरांना उडवलं; एकाचा मृत्यू, अभिनेत्रीही गंभीर जखमी

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या कारचां भीषण अपघात झाला आहे. तिच्या करने दोघांना उडवलं असून त्यात एकाच मृत्यू झाल्याचं सोमर येत आहे.  तर एकजण गंभीर जखमी आहे.मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली.

उर्मिला कोठारेच्या कारचा भिषण अपघात

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भिषण अपघात झाल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे.  उर्मिला सकाळी कामावरून घरी परत असताना हा अपघात झाला. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. या घटनेत तिच्या कारने दोन मजुरांना धडक दिली असून यात एकाचा मृत्यू झालाय. तर अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली आहे.

मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या दोन मजुरांना तिच्या भरधाव कारने धडक दिली, या घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही कार मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेची असल्याचीच माहिती  समोर आली आहे.

त्याचप्रमाणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला काल रात्री तिचे शूटिंग संपवून कारमधून घरी जात होती. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोघांना धडक दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kanetkar (@urmilakothare)

उर्मिलाच्या कारने 2 मेट्रो कामगारांना उडवले, एकाचा मृत्यू

ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. या अपघातात एका मजूराचा मृत्यू झालाय. तर, एकजण गंभीर जखमी असल्याचं समजतंय. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

अपघातात अभिनेत्रीही जखमी 

उर्मिलाही या अपघातात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  तसेच या अपघातातमध्ये उर्मिलाला कितपत दुखापत झाली आहे याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या अपघाताचे स्वरुप पाहता हा अपघात गंभीर असल्याचे लक्षात येत आहे.

उर्मिला कोठारे ही नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेतून तब्बल 12 वर्षांनी उर्मिलाने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं होतं. दिग्दर्शक आणि अभिनेता आदिनाथ कोठारेची ती पत्नी असून निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे.  पण या अपघाताच्या घचनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्… आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्…
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये...
‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
HMPV आणि COVID-19 दोन्ही आजार सारखेच आहेत की वेगळे? जाणून घ्या
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट