धक्कादायक! बोगीच्याखाली असलेल्या ट्रॉलीत झोपून तरुणाचा 290 किमीचा प्रवास
मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रेल्वे कर्मचारी ट्रेनचे रोलिंग आणि अंडर गियर तपासत होते. यावेळी ट्रेनच्या एसी कोचखालील ट्रॉलीमधील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. ट्रेनच्या ट्रॉलीमध्ये चक्क एक तरुण झोपला होता. तरुणाने तब्बल 290 किमीचा प्रवास या ट्रॉलीतून केला. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली. इटारसी स्थानकावरून ट्रेनने प्रवास करून जबलपूरला पोहोचल्याचे या तरुणाने चौकशीत सांगितले. पश्चिम मध्य रेल्वेच्या कॅरेज आणि वॅगन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तरुणाला पकडून आरपीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून तरुणावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रेल्वे संरक्षण दल या प्रकरणाचा तपास करत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अतिरिक्त पावले उचलली जातील असे ते म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List