खचू नका, निराश होऊ नका, मशाल जिंकली आहे हे जनताच सांगतेय!
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा विजय मिळाला. मात्र विधानसभेच्या वेळी समाधानकारक यश मिळाले नाही. पण कुणीही नाराज होऊ नये. मशाल जिंकली आहे हे जनताच सांगतेय. कारण ईव्हीएममध्ये घोटाळा करूनच भाजप व गद्दारांनी सत्ता मिळवली असून आगामी जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेनेचाच बोलबाला राहील. त्यामुळे खचू नका, निराश होऊ नका, असे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोवेली येथे झालेल्या मेळाव्यात केले.
शिवसेनेच्या झालेल्या मेळाव्यास ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील. त्यामुळे एकदिलाने आणि नव्या जोमाने या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे, असेही साईनाथ तारे यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यास ‘समाज कल्याण न्यास’चे डॉ. सोन्या पाटील, नितीन सुरोशी, तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक परशुराम पिंताबरे, अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी शायद मुल्ला, रमेश बांगर, रामदास लोणे, जैतू मुठोळकर, संतोष सुरोशी, कैलास मगर, बंधू जाधव, मधुकर वाळिंबे, राम कुंभार, भास्कर टेंभे, नरेश सुरोशी, आत्माराम भोईर, गुरुनाथ मोहिते, प्रवीण भोईर, भरत दळवी, काशिनाथ चोरगे, नवनाथ मिरकुटे, सुदाम भोईर, भूषण जाधव, मायकल गायकर आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List