बालकांची खरेदी-विक्री प्रकरणात 11 वी अटक; कारवार येथून नर्सला पकडले
लहान मुलांच्या खरेदी-विक्री प्रकरणात माटुंगा पोलिसांनी आणखी एक अटक केली आहे. कारवार येथून नर्स असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या 11 झाली आहे. या रॅकेटने आणखी बालकांची विक्री केली असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
दादर येथील एका विवाहितेने तिच्या सवा महिन्याच्या मुलीला अवघ्या एक लाखात विकले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर उपायुक्त रागसुधा आर यांच्या मार्गदर्शनाखाली माटुंगा पोलिसांनी झटपट तपास करत त्या निर्दयी मातेसह लहान बालकांची खरेदी विक्री करणाऱया नऊ जणांचे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. या रॅकेटमधील आणखी एक आरोपी अब्दुलकरीम नदाफ (52) याला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या होत्या. त्यानंतर आणखी सखोल तपास करत पोलिसांनी कारवार येथील वीणा तांडेल या नर्सचे काम करणाऱया महिलेला बेडय़ा ठोकल्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List