Breaking News : भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करुन खून, कारण अस्पष्ट
पुण्यातील विधानपरिषेदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे अपहरण करुन खून करण्यात आला आहे. पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे.
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे आज पुण्यातील सोलापूर मार्गावरील हॉटेल ब्ल्यु बेरी समोर थांबले होते. तेव्हा एक कार आली, त्या कार मधून काही लोक बाहेर आले आणि त्यांनी वाघ यांचे अपहरण केले. त्यानंतर ही गाडी सोलापूरच्या दिशेने गेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने वाध यांचे अपहरण झाल्याचे समोर आले. पण आज संध्याकाळी यवत गावाजवळ वाघ यांचा मृतदेह आढळला. पण वाघ यांचा खून का झाला याचे कारण कळालेले नाही. पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List