काँग्रेस आपला स्थापना दिवस नवीन मुख्यालयात साजरा करणार, कोटला मार्ग असेल नवीन पत्ता
काँग्रेस पक्ष यंदाचा स्थापना दिवस त्यांच्या नवीन मुख्यालयात साजरा करू शकते. 24 अकबर रोड ऐवजी आता काँग्रेसचे नवे मुख्यालय 9A कोटला मार्ग असेल. त्यासाठी आवश्यक सरकारी मंजुरी मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस मुख्यालयाचे नाव इंदिरा भवन असेल. काँग्रेसचा स्थापना दिवस दरवर्षी 28 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यंदा पक्षाचा स्थापना दिवस इंदिरा भवन येथे साजरा करण्याची तयारी सुरू आहे, असं बोललं जात आहे.
काँग्रेस मुख्यालयाची नवीन इमारत पूर्णपणे तयार आहे. या नवीन इमारतीत काँग्रेसचे मुख्यालय खूप पूर्वी हलवले जाणार होते, मात्र विविध कारणांमुळे ते लांबणीवर पडत गेले. नवीन मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम 2016 मध्ये सुरू झाले होते.
काँग्रेसच्या नवीन कार्यालयात अनेक सुविधा
पूर्वी इंदिरा गांधींच्या जयंतीदिनी (19 नोव्हेंबर) नवीन मुख्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची बातमी आली होती. मात्र काही आवश्यक मंजूरी न मिळाल्याने हे होऊ शकले नाही. काँग्रेसच्या नवीन कार्यालयात काँग्रेस अध्यक्ष आणि एलआयसीसी महासचिवांची कार्यालये, इतर अधिकाऱ्यांसाठी रूम्स, कॉन्फरन्स रूम, लायब्ररी आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनसाठी जागा आहे.
दरम्यान, 28 डिसेंबर हा काँग्रेस पक्षाचा 140 वा स्थापना दिवस आहे. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. याचे संस्थापक एओ ह्यूम होते. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेत ह्यूम यांच्यासोबत आणखी 72 सदस्य होते, ज्यांनी पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. वोमेश चंद्र बॅनर्जी यांची पक्षाचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आतापर्यंत पक्षाला 56 अध्यक्ष मिळाले आहेत. मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List