नाटय़संमेलनानिमित्त ‘एक सांस्कृतिक जल्लोष’चे आयोजन, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांची संकल्पना
शंभराव्या नाटय़संमेलनाच्या निमित्ताने मुंबईकर रसिकांसाठी ‘एक सांस्कृतिक जल्लोष’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दादरमधील शिवाजी मंदिर येथे शुक्रवार, 27 डिसेंबरला संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. रंगकर्मी अशोक मुळ्ये यांची ही संकल्पना आहे.
‘एक सांस्कृतिक जल्लोष’ या कार्यक्रमात नाटय़गीते, हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा, कथ्थक, क्लासिकल आणि लावणी नृत्यांचा रंगमंचीय आविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे. विघ्नेश जोशी, नीलिमा गोखले, जयंत पिंगुळकर, श्रीरंग भावे, संपदा माने, ओमकार प्रभुघाटे, स्मृती तळपदे, आर्चिस लेले, सागर साठे, केदार परुळेकर यांचा सहभाग आहे. यावेळी 51 डॉक्टरेट पदव्या मिळवलेले विचारवंत-शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘माझा डॉक्टरेट पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती यावेळी असणार आहे. कार्यक्रमाच्या मोजक्याच विनामूल्य प्रवेशिका 25 डिसेंबरपासून सकाळी 8.30 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत नाटय़गृहात उपलब्ध आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List