पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून सात तास चौकशी
पोर्नोग्राफीसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिची सोमवारी ईडीने सात चौकशी केली. यासंबंधी गेल्या आठवड्यात गहनाच्या घरी ईडीने छापेमारी केली होती. यानंतर सोमवारी तिची चौकशी करण्यात आली असून, मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
2021 मध्ये पहिल्यांदा गहनाचे नाव पोर्नोग्राफी प्रकरणात समोर आले होते. यानंतर गेल्या आठवड्यात केलेल्या छापेमारीत गहनाच्या घरातून काही वस्तू जप्त करण्यात आल्या. छापेमारीनंतर गहनाचे सात बँक अकाऊंटही जप्त करण्यात आले. तसेच दोन मोबाईलसह काही कागदपत्रंही जप्त करण्यात आली.
ईडीने गहनाला मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अभिनेत्रीची ईडीकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List