न्यू इंडिया ऍशुरन्स कंपनी व स्टेट बँकेत नोकरभरती, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे प्रशिक्षण वर्ग
न्यू इंडिया अॅशुरन्स पंपनीमध्ये ‘असिस्टंट’ आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘ज्युनियर असोसिएट्स’ पदाकरिता नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे, यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ प्रयत्नशील आहे. याच हेतूने महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन व ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. या माध्यमातून अधिकाधिक भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघाने केले आहे. महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, कार्याध्यक्ष-आमदार विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन-ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन, पहिला मजला येथे रविवार व सुट्टीचे दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215) श्रीराम विश्वासराव (9869588469) विलास जाधव (9619118999) यांच्याशी संपर्क साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्गप्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List