या वर्षीचाही डिसेंबर महिना सरला, मुंबई-गोवा महामार्गाला मुहूर्त कधी? विधानसभेत शिवसेनेचा सरकारला सवाल

या वर्षीचाही डिसेंबर महिना सरला, मुंबई-गोवा महामार्गाला मुहूर्त कधी? विधानसभेत शिवसेनेचा सरकारला सवाल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सुरू झाला. कोकण ग्रीन फिल्ड मार्गाचे काम सुरू आहे. पण 2011 मध्ये सुरू झालेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. डिसेंबर महिन्यात हा महामार्ग सुरू होईल, असे आश्वासन प्रत्येक मंत्री देत असतो. पण हा महामार्ग कधी सुरू होईल हे आजही सांगता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव यांनी आज संताप व्यक्त केला.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना भास्कर जाधव यांनी या महामार्गाच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. या राज्यातील व या देशातील सर्वात रखडलेला महामार्ग हा मुंबई-गोवा महामार्ग आहे. 2011 मध्ये या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. या सभागृहात या महामार्गावर अनेकदा चर्चा झाली आहे. त्यावर प्रत्येक मंत्र्यांचे आश्वासन ठरलेले असते की येत्या डिसेंबर महिन्यात हा महामार्ग पूर्ण होईल. 2011 पासून आज 2024 चा डिसेंबर महिना संपत आला, पण तरीही महामार्ग पूर्ण झालेला नाही.

आता तरी निधी मिळेल

आता स्थगिती नाही असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते त्याचा संदर्भ घेऊन भास्कर जाधव पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे भाजप सरकारमध्ये गेल्यावर आम्ही उद्धव ठाकरेंसोबत राहिलो. राष्ट्रवादीचे आमदार हे शरद पवारांसोबत राहिले आणि काँग्रेसचे आमदार काँग्रेससोबत राहिले त्यांच्या सगळ्यांच्या कामाला स्थगिती दिली होती. अडीच वर्षांच्या काळात विरोधी आमदारांना एक पैशाचाही निधी दिला गेला नाही. असे पहिल्यांदाच घडले, पण या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत तसे घडणार नाही, आम्हाला निधी मिळेल अशी अपेक्षा या वेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त केली.

गडकरींनी पनवेल ते चिपळूण प्रवास करावा

वास्तविक हा महामार्ग प्राधान्याने व्हायला हवा होता. पण पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आमच्यावर काय राग आहे ते आम्हाला माहिती नाही. मी त्यांची अनेकदा भेट घेतली. या रस्त्याबद्दल अनेकांच्या शिव्या खाल्या असे गडकरी यांचे वाक्य ऐकले आहे. यावर एक पुस्तक लिहून होईल, असेही ते म्हणाले. पण नक्की काय झाले? कशामुळे एवढी अडचण आली? आम्ही काय केले पाहिजे? हे गडकरींनी आमच्यासमोर येऊन सांगावे. मी त्यांना अनेकदा विनंती केली की, तुम्ही पनवेलला उतरा आणि पनवेलवरून एक व्हॅनिटी व्हॅनमधून फक्त चिपळूणपर्यंत माझ्याबरोबर चला. तेव्हा तुम्हाला रस्त्याची वस्तुस्थिती कळेल. वास्तविक मुंबई-गोवा महामार्गावरील सध्याच्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे फक्त रुंदीकरण आहे. यात फक्त कशेळी घाटात नवीन बोगदा काढलेला आहे. माणगाव व इंदापूर शहराच्या बाहेरून एक रस्ता काढायचा आहे. पण कशेळी घाटातील बोगद्याची एक मार्गिका सुरू झाली याकडे भास्कर जाधव यांनी लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल PM मोदी आज 38 मिनिटे बोलले, त्यातले 29 मिनिटे त्यांनी दिल्लीतील जनतेला शिव्या दिल्या – अरविंद केजरीवाल
पंतप्रधान दिल्लीच्या जनतेला दररोज शिवीगाळ करत आहेत, दिल्लीच्या जनतेचा अपमान करत आहेत, दिल्लीची जनता भाजपला या अपमानाचे उत्तर निवडणुकीत देईल,...
Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
मुंबईकरांना मिळणार सर्वत्र मेट्रो प्रवासाचा आनंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल
स्वतंत्र हिंदुस्थानात RBI ने सर्वातआधी जारी केली होती ‘ही’ नोट, जाणून घ्या नोटेवर कोणाचा छापण्यात आला होता फोटो
Affordable Maruti Brezza – मारुती ब्रेझाची किंमत होऊ शकते कमी, लहान इंजिनसह येईल नवीन मॉडेल
टीव्ही मालिका पाहून तांत्रिकाने दोघांचा काटा काढला, पण तिसऱ्याला संपवण्याच्या तयारीत असतानाच पर्दाफाश