मस्कच! फक्त आठवड्यात कमावले 8.66 लाख कोटी
अमेरिकेतील उद्योगपती एलन मस्क यांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे. 16 आणि 17 डिसेंबर अशा दोन दिवसांत मस्क यांच्या संपत्तीत 31 अब्ज डॉलरची वाढ झाली असून अवघ्या एका आठवड्यात त्यांची नेटवर्थ 100 अब्ज डॉलरहून जास्त म्हणजे जवळपास 9 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे.
संपत्तीत वाढ होण्याचा हाच सिलसिला सुरू राहिल्यास मस्क यांची संपत्ती 500 अब्ज डॉलरवर पोहोचण्यास जास्त वेळ लागणार नाही. वार्षिक आधारावर मस्क यांच्या एकूण नेटवर्थमध्ये तब्बल 257 अब्ज डॉलरची वाढ पाहायला मिळाली आहे. संपत्तीत मस्क पुढे असून 250 अब्ज डॉलरच्या संपत्तीसोबत जेफ बेजोस दुसऱ्या नंबरवर आहेत. 12 डिसेंबरला मस्क यांची संपत्ती 384 अब्ज डॉलर होती.
अवघ्या एका आठवड्याभरात त्यांच्या संपत्तीत 102 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यात सर्वात मोठा वाटा 67 बिलियन डॉलरचा आहे. 11 डिसेंबरला एका दिवसात स्पेसएक्सच्या गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी केले. यामुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन वाढले. यात एलन मस्क यांना 45 अब्ज डॉलरची वाढ मिळाली, तर टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने मस्क यांना 22 अब्ज डॉलरचा फायदा झाला.
अब की बार 500 अब्ज डॉलर पार
एलन मस्क यांची संपत्ती 500 अब्ज डॉलर पार होण्याच्या नजीक आहे. यासाठी त्यांना फक्त 14 अब्ज डॉलरची गरज आहे. नव्या वर्षाच्या आधीच मस्क हे 500 अब्ज डॉलरचे धनी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हे विजयी झाल्यापासून एलन मस्क यांचे अच्छे दिन आले आहेत. त्यांच्या संपत्तीत सुस्साट वाढ होताना दिसत आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर मस्क यांच्या संपत्तीत 222 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, तर डिसेंबरमध्ये 143 अब्ज डॉलरची वाढ झालीय. अवघ्या एका आठवडाभरात त्यांच्या संपत्तीत 102 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यात सर्वात मोठा वाटा 67 बिलियन डॉलरचा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List