Mumbai Boat Capsized: मुंबई बोट अपघात फोटोमधून, नेमकी कशी घडली घटना जाणून घ्या…
नीलकमल ही बोट ११० प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडियावरुन निघाली होती. बोट निघाल्यानंतर सुमारे ३५ मिनिटांनी नौदलाची बोट या बोटीवर आदळली. त्यामुळे बोट उलटली.
नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावण्यात आले होते. नवीन इंजिनाची चाचणी घेण्याचे काम सुरु होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली.
बोट अपघातात सुखरूप झालेल्या प्रवाशांनी घटनाक्रम सांगितला. बोटीत सुरक्षेचा प्रश्न होता. जेव्हा बोटीत पाणी गेले त्यानंतर आम्ही वरती जाऊन लाईव्ह जॅकेट घातले. त्यामुळे आम्ही बचावलो आहोत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List