Hina Khan Latest News – हिना खानने सांगितल्या कर्करोगावरील वेदना, चाहत्यांसमोर मन केलं मोकळं
‘ये रिश्ता क्या केहेलाता है’ फेम हिना खान गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपला एक फोटो शेअर केला होता त्यात ती युरीन बॅग घेऊन चालताना दिसत होती. ते पाहून तिच्या चाहत्यांचे काळीज हेलावले होते. आता तिने एक लेटेस्च पोस्ट शेअर करत तिने कर्करोगावर वेदना सांगत चाहत्यांसमोर मन मोकळे केले आहे.
हिना खान सातत्याने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्करोगाचा प्रवास दाखवत असते. आता नुकतेच हिनाने आपल्या चाहत्यांना सांगितले की, ती कोणत्या प्रकारच्या वेदनांचा सामना करत आहे. हिनाने त्यामध्ये लिहीले आहे की, एक महिला जिने आयुष्यातील अनेक दु:खातून स्वत:ला सावरले आहे आणि तरीही तिचे मन साफ आहे, ती महिला नाही तर एक जादूगार आहे.
यासोबत हिनाने यावर्षातील शिकण्यासारखी गोष्ट कोणती होती. तिने आपल्या इंस्टास्टोरीवर सांगितले की, जेव्हा तुम्ही खऱ्या आयुष्यात वादळाचा सामना करत असतात त्यावेळीही तुम्हाला कसे आनंदी राहायचे आहे. ती म्हणाली आयुष्यात अनेक कठिण प्रसंग येतात मात्र आनंदही तेवढाच मिळतो. तिने पुढे लिहीले की, तिच्या आयुष्यात केवढेही मोठे वादळ आले असले तरी तिच्याकडे हसण्याचे कारण आहे. ती हसतच पुढे जात राहणार असेही तिने स्टोरीत म्हटले आहे.
सध्या हिना खान हिला स्तनाचा कर्करोग झाला असून त्यावर उपचार सुरु आहेत. ती अनेक महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. मात्र आनंदाची ही गोष्ट आहे की, हिना खान बऱ्यापैकी बरी होत चालली आहे. मात्र या प्रवासात तिने काय सहन केले ते ती कायम आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List