अत्यंत दयनीय अवस्था, HC च्या निवृत्त न्यायाधिशांना फक्त 10 ते 15 हजार रुपये पेन्शन; सुप्रीम कोर्ट नाराज
उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांना मिळणाऱ्या पेन्शनवरून सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. निवृत्त न्यायाधिशांना केवळ 10 ते 15 हजार रुपये पेन्शन मिळत आहे. ही अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनवाणीदरम्यान म्हटले आहे.
न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या पेन्शन प्रकरणाशी संबंधित दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. काही प्रकरणांमध्ये मानवतावादी दृष्टीकोनाचा स्वीकार केला पाहिजे, असे सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले. सरकारतर्फे अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी खंडपीठाला जानेवारीमध्ये सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. तसेच हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले आहेत.
तुम्ही सरकारला समजावून सांगितले तर बरे होईल, आमचा हस्तक्षेप टाळावा. या प्रकरणाचा विविध प्रकरणांच्या आधारावर निर्णय घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल तो सर्व उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांना लागू होईल, असे खंडपीठाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List