एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्रीचा भयानक अंत, हातगाडीवर काढली अंत्ययात्रा
Actress Life: हिंदी चित्रपटसृष्टीच्या युगात अशा अनेक अभिनेत्री होत्या ज्यांना रातोरात यश मिळालं. अभिनेत्रींनी मोठ्या पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनावर राज्या केलं. पण आज त्या अभिनेत्रींना फार कोणी ओळखत देखील नसेल. अभिनेत्रींना प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं पण खासगी आयुष्यात फक्त वेदना… असंच एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीसोबत देखील झालं. एका रात्रीत अभिनेत्रीला लोकप्रियता मिळाली. पण दुसऱ्याच क्षणी अभिनेत्री एकटी पडली. शेवटच्या क्षणी देखील अभिनेत्रीकडे कोणीही नव्हतं.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून अभिनेत्री विमी आहे. 60 च्या दशकात हिंदी सिनेविश्वात विमी यांचा बोलबाला होता. तेव्हा विमी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी अभिनेते रांगेत असायचे. सुनील दत्त, शशि कपूर यांसारख्या सुपरस्टारसोबत विमी यांनी स्क्रिन शेअर केली.
पण ‘हमराज’ सिनेमातून विमी प्रसिद्धी झोतात आल्या. सिनेमातील गाणी तुफाम हीट झाले. शिवाय सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘हमराज’ सिनेमानंतर विमी यांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. मॅगझीनच्या कव्हरपेज त्यांचा फोटो येऊ लागला होता. तेव्हा मॅगझीनच्या कव्हरपेज फोटो म्हणजे फार मोठी गोष्ट होती.
विमी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी कोलकाता येथील एका उद्योजकासोबत लग्न केलं. उद्योजक गडगंज श्रीमंत होता. विमी फक्त स्वतःची आवड म्हणून सिनेमांमध्ये काम करत होत्या. पण कालांतराने विमी यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. विमी यांचे ‘आबरू’, ‘वचन’ आणि ‘पतंगा’ हे तीन सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर विमी यांना ऑफर मिळणं देखील बंद झालं.
प्रोफेशनल आयुष्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर विमी यांच्या खासगी आयुष्यावर देखील त्याचा परिणाम झाला. कठीण काळात विमी यांची पतीने साथ सोडली. अशात विमी जॉली नावाच्या एका ब्रोकरसोबत राहू लागल्या. त्यानंतर विमी यांची अवस्था दिवसागणिक वाईट होऊ लागली. त्यांनी स्वस्त दारू पिण्यास देखील सुरुवात केली.
हातगाडीवर काढली अंत्ययात्रा
एकेकाळी चाहत्यांची मोठी संख्या असणाऱ्या विमी यांच्यासोबत शेवटच्या क्षणी कोणीच नव्हतं. त्याचं लिव्हर पूर्णपणे खराब झालं होतं. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी नानावटी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डमध्ये विमीने अखेरचा श्वास घेतल्याचं सांगण्यात येत. एकेकाळी महागड्या वाहनांतून मुंबईच्या रस्त्यावर फिरणाऱ्या विमीचा मृतदेह हातगाडीतून स्मशानभूमीत नेण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List